शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Satara- नात्याला काळिमा: सख्ख्या भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

By दत्ता यादव | Published: September 08, 2023 1:09 PM

बहीण गरोदर; आई-वडील मोलमजुरीला गेले असताना वारंवार कृत्य

सातारा : कोरेगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षांच्या अल्पवयीन भावानेच आपल्या १५ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला. यात बहीण गरोदर राहिली असून, पोलिसांनी संबंधित संशयित भावाला तातडीने ताब्यात घेतले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी १५ वर्षांची असून, मागील काही वर्षांत शाळा सोडून ती घरीच राहत होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असायचे. पीडितेचा भाऊ राहायला नातेवाइकांकडे परगावी होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेचा भाऊ एके दिवशी दुपारीच घरी आला. आल्यानंतर त्याने बहिणीला दमदाटी करून जबरदस्तीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. घरातील कोणास या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची त्याने धमकी दिली.

दरम्यानच्या काळात अनेक वेळा घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन गेल्या आठ महिन्यांपासून भाऊ वारंवार बहिणीवर अत्याचार करत राहिला. बहिणीने माराच्या भीतीने या गोष्टीची वाच्यता कुठेच केली नाही. मात्र मंगळवार, दि. ५ रोजी तिच्या हातापायाला सूज आल्याने मुलीच्या आईने तिला शासकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलीच्या आईला व पोलिसांना कळवली. त्यावेळी खोदून विचारल्यानंतर पीडित मुलीने सख्ख्या भावाने अत्याचार केल्याचे आपल्या आईला सांगितले.पोलिसांनी तत्परता दाखवत ताबडतोब अत्याचारी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलास सातारा येथे बालन्याय मंडळ या ठिकाणी हजर केले असता त्याला बालन्याय मंडळाने अभिरक्षा सुनावली असून. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस