सातारा : गौरीशंकरच्या डॉ़ पी़ व्ही़ सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मधल्या सुटीसाठी आणलेले भोजन त्यांनी कुरणेश्वर मंदिरासमोर बसलेल्या दीनदुबळ्यांना घास देऊन सामाजिकतेचे दर्शन घडविले़ स्वार्थापलीकडे अनोखे विश्वही असते, याची जाणीव ही चिमुरड्यांनी करून दिली़ मनात भाव असले तर इतराचे दु:ख ही आपण सहज दूर करू शकतो, हा मंत्र ही या चिमुरड्यांनी दिल्याचे जाणवते़गरीब, श्रीमंतापेक्षा माणुसकीचा ओलावा हाच सर्वश्रेष्ठ ठरतो, हे गौरीशंकरच्या डॉ़ पी़ व्ही़ सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे़ आयुष्यातील चढ-उताराच्या जीवन प्रवासात कळत नकळत आलेले भोग मानवाला सर्व काही शिकवत असतात. माणुसकीसाठी धावून जाणे ही आपली साधूसंताची शिकवण ही डॉ़ पी़ व्ही़ सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आचरणात आणून ती कृतीमध्ये सिद्ध करणाऱ्या या चिमुरड्यांच्या मनातील भावस्पर्शाने येणारे-जाणारे भक्तगण ही भाऊक झाले़ (प्रतिनिधी)
इवल्याशा हृदयात़.़.़. आभाळाएवढे मन!
By admin | Published: February 16, 2017 11:13 PM