फलटण : राजाळे (ता. फलटण) गावचे ग्रामदैवत श्री जानाई देवीची यात्रा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
राजाळे गावतील श्री जानाई देवीची वार्षिंक यात्रा रविवार, दि. २ मे व सोमवार, दि. ३ मे रोजी आहे. यावर्षी पुन्हा कोरोना महामारीच्या संकटामुळे श्री जानाई मंदिर व इतर सर्व मंदिरे देखील बंद राहणार आहेत.
यात्रा रद्द केल्याने सर्वांनी घरूनच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घ्यावे. नातेवाईक नेहमीप्रमाणे दर्शनास गावात येणार असतील, तर त्यांना येण्यास मज्जाव करावा. बाहेरील वाहने व माणसे येणार नाहीत, तसेच मंदिरात कोणी ग्रामस्थ दर्शनास जाणार नाहीत, यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. देवाच्या काठ्यांचे घरीच पूजन करून तेथेच विसर्जन करावे. गावात व्हिडिओ कॅमेरा तैनात करण्यात आला असून, कोणी एकत्र येऊन जमाव केल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई व दंडात्मक कारवाई होईल. ग्रामस्थांनी दक्षता घेऊन जिल्हा प्रशासनास व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच तथा अध्यक्ष, ग्रामदक्षता कमिटी राजाळे यांनी केले आहे.