सातारा /कोरेगाव: जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखाना बंद पडण्याची भीती काही लोक दाखवतात, ती चुकीची आहे. हा कारखाना कुणी घेतला याचे उत्तर हिम्मत असेल तर अजित पवार यांनी द्यावे, असे आव्हान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
सोमय्या यांनी बुधवारी सकाळी जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन संचालकांशी चर्चा केली. त्यांनी सभासद, संचालकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकत्यार्ंनी त्यांना घेराव घातला. तसेच तुमच्या अशा बोलण्याने कारखाना बंद पडेल, अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर मात्र सोमय्या चांगलेच भडकले. हा कारखाना सामान्य माणसांचा कारखाना आहे. शेतकरी, मजूर, वाहनधारकांना दिलासा देतो. कारखाना बंद पडणार नाही. कोणी दहशतीचे वातावरण करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शेतकरी, मजूर यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही.
उच्च न्यायालयाने कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, ती कुठल्याही परिस्थतीत होणार, असे सोमय्या यांनी सांगितले.सोमय्या म्हणाले, कारखाना वाचावा म्हणून येथील सभासद संचालक मला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांनी मला गावामध्ये येण्याची मागणी केली होती. त्यांच्या आग्रहाखातर व त्यांची व्यथा पाहून इथे आलो आहे. वयाची महत्त्वाची ४० वर्षे कारखान्याच्या उभारणीत घालवली. शालिनीताई पाटील यांना लादलेल्या निवडणुकीला सामोरे जावे लागले. कोरेगाव तालुका हा कोरा आहे. आपण आल्या आहात. प्रपंच स्थिर होणार असेल तर कारखाना द्यावा लागेल. आम्ही रात्रीचा दिवस केला. पैसे खर्च करुन कारखाना उभा केला. व्हा. चेअरमन आहे. अत्यंत परिश्रमाने हा कारखाना चालू केला.
सत्तेच्या जोरावर कारखाना कायदेशीर बेकायदा कारखाना ताब्यात घेतला.कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर व्हावे, या उद्देशाने माजी आमदार शालिनीताई पाटील यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करुन जरंडेश्वर साखर कारखाना उभा केला; परंतु काही लोकांनी सत्तेच्या बळावर हा कारखाना ताब्यात घेतला असून तो कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा करावा, अशी मागणी कारखान्याच्या संचालकांनी माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासमोर मांडली. कोरेगाव तालुक्यात इतका ऊस होता म्हणून कारखाना उभा केला, त्यासाठी किती कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या, हे संस्थापकांना माहित आहे, अशा शब्दांमध्ये या संचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा : सोमय्या
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया ही अत्यंत चुकीच्या पध्दतीने झालेली आहे. संस्थापक सभासदांनी कायदेशीर मार्गाने लढा उभारला आहे. चुकीचे झाले असल्यानेच मी या संदर्भात आवाज उठवला आहे, मी चुकीचं बोलत असेन तर माझ्यावर अजित पवार यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, असे आव्हान देखील सोमय्या यांनी यावेळी दिले.