लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जावळी तालुक्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, कुपोषणमुक्तबरोबरच देशाची भावी पिढी सुदृढ घडवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे योगदान अतिश महत्त्वपूर्ण आहे, असे गौरवोद्गार जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी काढले.
जावळी पंचायत समितीच्या सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यांच्यामार्फत जावळी तालुक्यातील सॅम व मॅम मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, पोषण आहार व औषध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बुध्दे बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी, तहसीलदार राजेंद्र पोळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री पार्टे शेलार, डॉ. अमृत जाधव, प्रकल्प अधिकारी मानसी सपकाळ, मदतनीस व बालकांच्या माता उपस्थित होत्या. सभापती गिरी, तहसीलदार पोळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेलार यांनी कुपाषित बालकांना औषधांचे वाटप केले. दालमिया शुगरच्या आनंद कांबोजी यांनी पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला.
आहाराबाबत प्रकल्प अधिकारी मानसी सपकाळ, औषधोपचाराबाबत डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका मनीषा पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका ननावरे, कांबिरे, सावंत, कारंडे, श्याम राठोड यांनी परिश्रम घेतले. कांबिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो आहे..!