वेळे : ओझर्डे, ता. वाई येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८ ) हे सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले.
जवान सोमनाथ तांगडे हे सैन्यदलातील सिग्नल या डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर सिक्कीम येथे कार्यरत होते. सिक्कीममधील कॉलिंग पॉंग येथील १० किलोमीटरवर असलेल्या बर्फाच्या टेकडीवर इतर सहकार्यांसोबत ते नेमणुकीस होते. दरम्यान, दि, ८ रोजी बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री ३ वाजण्याच्या सुमारास अचानक झोडपून काढले. त्यात त्यांचे तंबू उडून गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भीषण थंडीत कुडकुडत बसले. त्या वेळी ओझर्डे तालुका वाई येथील रहिवासी असलेले जवान सोमनाथ तांगडे हे चक्कर येऊन तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलिंग पॉंग येथील बॅरेकपुरमधील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली, पण तेव्हापासून ते कोमात गेले. दि १६ रोजी त्यांची उपचारादरम्यानच सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मावळली. त्यांचे शव सिक्कीमवरून विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रीमती रेश्मा, मुलगी सिद्धी (वय १२), परी (वय ८) असे आहेत .
शहीद जवान सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या आकस्मित जाण्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
फाटो आहे..