शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

जे नसे ललाटी.. ..ते करी तलाठी!

By admin | Published: March 25, 2015 10:49 PM

सालपेतील प्रकार : चक्क सातबाऱ्याहून शेतकऱ्याची विहीर गायब

आदर्की : फलटण पश्चिम भागातील सालपे येथील शेतकरी मनोहर शिंदे यांच्या हिश्याची बारा आणे विहीर सातबारा उताऱ्यावरून गायब झाल्याने ‘जे नसे ललाठी ते करी तलाठी’ करीत असल्याचा अनुभव संगणक युगातही शेतकऱ्याला आला आहे.सालपे, ता. फलटण येथील गट नं. २७० मध्ये विहीर व विहिरीवर वडिलापार्जित विद्युत पंप आहे. काही दिवसांपूर्वी त्या जमिनीचा उतारा काढण्यासाठी मनोहर शिंदे तलाठ्याकडे गेले. तलाठ्यांनी उतारा दिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. १६ आणे विहिरीतील १२ आणे हिस्सा गायब झाल्याचे त्यांना समजले. सुरेश शिंदे यांच्या नावावर केवळ आता चार आणे हिस्सा राहिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी फेरफार ही काढला. त्यामध्येही १२ आणे हिस्सा व नावाला कंस केला असल्याचे दिसून येत आहे.फेरफारवर १९८३ मध्ये बँकेचे कर्ज काढले. ते फेडले त्याचा बोजा कमी करण्यासाठी जमिनीवरील बोजा कमी करणारे पत्र दिले. त्या बँकेचा बोजा कमी केल्याचा फेरफार आहे.असे असताना विहिरीचा १२ आणे हिस्सा गायब कसा झाला. कोणतीही चूक नसताना तलाठ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता अर्ज करा, मी त्यावेळी नव्हतो, अशी उडवाउडवीची उत्तर देत आहेत. असे शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)मनोहर शिंदे यांचे नाव सातबाऱ्यावरून काढताना २००० मध्ये कंस झाला आहे. मी त्यावेळी सालपे येथे कार्यरत नव्हतो. त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज केल्यास दुरुस्त करून देऊ. - अडसूळ, सालपे तलाठी मला प्रकार माहीत नाही. त्यांनी रितसर अर्ज केल्यास फेरफार पाहून चूक दुरुस्त करण्यात येईल.- जोशी, मंडल अधिकारी, तरडगाव