लोणंद : लोणंद येथील रेल्वेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी आता शेवटची संधी म्हणून दोन दिवसांची वेळ दिली आहे. यासंदर्भातील जाहीर नोटीस फ्लेक्सद्वारे ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. यामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत जागा खाली करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.३० नोब्हेंबरला पोलिसांच्या फौजफाट्यात जेसीबीच्या साह्याने ही जागा खाली करण्यात येणार असल्याचे लिहिण्यात आले आहे. अशा प्रकारचे फ्लेक्स या भागात ठिकठिकाणी लावण्यात या भागात राहणाºया दोनशे पन्नास कुटुंबांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.लोणंद रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूच्या गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून २५० पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी आपले संसार थाटले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, डोंबर वस्ती, वडार वस्ती व घिसाडी समाजाचे वास्तव्य आहे. यामधील बहुतांश कुटुंबे अतिशय गरीब असून, अनेकांची रोजची पोटाची खळगी भरण्याचीही भ्रांत आहे.या भागात असणारी आंबेडकर कॉलनीतील घरे ही कच्च्या दगड विटांची, पत्र्याची आहेत, तर डोंबारवस्ती येथील घरे कपड्याचे पाल करून बांधण्यात आलेली आहेत. येथे राहणाºया अनेकांची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी झाली आहे. त्यावेळी ग्रामपंचायतीने त्यांना लाईट व पाण्याचे कनेक्शनही दिलेली आहेत. मात्र, अचानक रेल्वे प्रशासनाने या भागात पॉवर हाऊसची उभारणी करण्यासाठी या जागेत राहणाºया कुटुंबांना गेल्या सहा महिन्यांपासून जागा खाली करण्यासाठी तगादा लावला आहे. यासंदर्भात तशा लेखी नोटिसा दिल्या होत्या. या बेघर होणाºया कुटुंबांनी त्यावेळी खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांना भेटून पर्यायी जागा मिळण्यासाठी प्रयत्नही केले होते, यासंदर्भात उपोषण व आंदोलनही करण्यात आले होते.रेल्वे प्रशासनाला पर्यायी जागा मिळेपर्यंत जागा खाली करण्यात येऊ नये, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या बेघरांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. आता मात्र रेल्वेकडून वैयक्तिक नोटीस न देता फ्लेक्सच्या साह्याने जाहीर नोटीस बोर्ड ठिकठिकाणी लावण्यात आले असून, ३० तारखेपर्यंत जागा खाली करण्याची शेवटची संधी देण्यात आलीआहे.अजून काही दिवसांचीमुदत देण्याची मागणी३० तारखेला पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने जागा खाली करण्यात येणार असल्याचा स्पष्ट उल्लेखच केला आहे. यात २५० कुटुंबाचे धाबे दणाणले आहेत. ही बेघर होणारी कुटुंबे सैरभैर होऊन पर्यायी जागा मिळण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. पर्यायी जागा मिळेपर्यंत रेल्वेने आम्हाला आणखी काही दिवसांची मुदत द्यावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.
अडीचशे कुटुंबांवर फिरणार जेसीबी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:12 PM