महाबळेश्वर: मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी महाबळेश्वर परिसरात पावसाचा तांडव झाला. प्रतापगड अंबेनळी घाट परिसरातील आजूबाजूच्या गावामध्ये ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे या भागातील ३५ पेक्षा अधिक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत. अशातच वाडाकुंभरोशी येथील वयोवृद्ध महिलेस जेसीबीच्या लोडरच्या माध्यमातून दरड पडलेला चिखल मातीचा रस्ता ओलांडून पलीकडील पोलादपूरच्या बाजूने दुसरे वाहन बोलवून पोलादपूर येथील रुग्णालयामध्ये नेहण्यात आले.
महाबळेश्वर, प्रतापगड परिसरातील दरड, जावळी, हरोशी, वाडाकुंभरोशी, प्रतापगड, दुधोशी, पार, कुमठे, कोंढोशी, गोगलवाडी, शिरवली, बिरमणी, बिरवाडी, हातलोट, घोणसपूर, चतुरबेट, दूधगाव, झांझवड, देवळी, येरणे, चिखली, पारूट, मालुसरे, मालुसरवाडी अशा गावांना सगळ्यात मोठा फटका पावसाचा बसला आहे. यातील काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. जवळपास दीडेशे हेक्टर शेती पावसात उद्धवस्त झाली आहे. प्रतापगड पार पोलादपूर व महाबळेश्वर या गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे खचले आहे. ठिकठिकाणी दरड कोसळल्याने दळवळण ठप्प झाले आहे. या परिस्थितीत वाडा कुंभरोशी व या परिसरातील इतर कोणत्या भागात वयोवृद्ध नागरिक आजारी पडत आहेत. ताप, थंडी, खोकला असे किरकोळ आजार अंगावर काढू शकतात; परंतु गंभीर आजार झाल्यावर महाबळेश्वरमध्ये घेऊन येऊ शकत नाहीत. रस्ता बंद असल्यामुळे पोलादपूर घेऊन जाऊ शकतो; परंतु निम्म्या रस्त्यापर्यंत एखादे वाहन बोलवून घेऊन जाऊ शकतात; परंतु रस्त्यामध्ये दरडी पडल्या आहेत. चिखल झाल्यामुळे रस्ता ओलांडून जाऊ शकत नाहीत. अशावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाडाकुंभरोशीमधील वयोवृद्ध आजीला जेसीबीच्या लोडरमध्ये आजींना घेऊन पोलादपूरच्या दिशेला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.