शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

महिलांच्या मोबाईलवर दागिने अन् कपड्यांचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:53 PM

जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : नोकरी मिळेना... लाखो रुपये गुंतवून कोणता व्यवसाय करावा, ग्राहक येतील का? ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नोकरी मिळेना... लाखो रुपये गुंतवून कोणता व्यवसाय करावा, ग्राहक येतील का? असे अनेक प्रश्न तरुणांसमोर पडतात. ग्राहकांशिवाय कोणताही व्यवसाय करणे अशक्य; पण व्यवसायाचा नवा ट्रेंड येत आहे. एकापेक्षा एक प्रकारच्या वस्तूंचे नमुने थेट ग्राहकांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठविले जातात अन् यातून लाखो रुपयांची उलाढाल चालत आहे.आॅनलाईनच्या जमान्यात ग्राहक आळशी होत चालला आहे. इंटरनेटवर कोणत्याही प्रकारच्या वस्तू पाहता अन् मागविता येतात. त्यामुळे आॅनलाईन वस्तू मागविणे एक फॅशनच बनली आहे. हाच धागा पकडून काही हुशार मंडळींनी सोशल मीडियाचा व्यवसायासाठी वापर सुरू केला आहे. दुकान, कामगार, वीजबिल अन् विविध परवाने अशी कोणतीही डोकेदुखी मागे न लागता व्यवसाय केला जात आहे.हा व्यवसाय कोणीतरी एक व्यक्ती सुरू करते. व्हॉट्सअ‍ॅपवर एक ग्रुप तयार केला जातो. त्यावर आपल्या ओळखीतले, नातेवाईक, मैत्रिणींना अ‍ॅड केले जाते अन् त्यांचा व्यवसाय सुरू झाला. सकाळ, दुपार, संध्याकाळी विविध कपडे, दागिने, मॉडेलचे फोटो या गु्रपवर टाकले जातात. सातत्याने फोटो पाहिल्यामुळे वस्तू खरेदी करण्याची इच्छा निर्माण होते. ग्रुपमधील सदस्यांना एखादी वस्तू आवडल्यास तो फोटो किंवा कोड नंबर ग्रुप अ‍ॅडमिनला वैयक्तिक पाठविला जातो. त्यानुसार संबंधित व्यक्ती ठोक विक्रेत्याकडून त्या मागवून घेतात. त्याबदल्यात कमिशन मिळाले की झाले काम.ग्रुपवर शेकडो व्यक्ती सदस्य असतात. त्यातील काही परजिल्ह्यातीलही असतात. त्याही त्यांच्या मैत्रिणींना यामध्ये सहभागी करून घेत असल्याने ही साखळी कित्येक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून चालते. बाजारभावापेक्षा कमी दराने या ठिकाणी वस्तू मिळत असल्याने सणवार, उत्सवाच्या वेळी अशा ग्रुपवरुरून उलाढाल चालते.कपड्यांना या ठिकाणी जेवढी चलती आहे. त्याचप्रमाणे दागिन्यांनाही पसंती दिली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने यामध्ये कानातील, नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्यांचे डिझाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचेही दररोज फोटो टाकल्यास किमान शंभर फोटो पाहिल्यानंतर एकदा तरी या वस्तू घ्याव्यात, असे नक्की वाटते. हीच युक्ती या व्यवसायासाठी केला जातो. अलिकडील काही दिवसांपासून तरुण मुलंही घड्याळ, व्हॉलेट, कंबरेचा पट्टा यासाठी या प्रकारचा व्यवसाय केला जातो. दुकानात ग्राहकांनी जाऊन खरेदी करण्याचा जमाना गेला असून दुकानच ग्राहकांच्या मोबाईलवर जात असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.पुरुष मंडळी कोसो दूरएखादी वस्तू आवडली की खरेदी करण्याची मानसिकता महिलांची असते. त्यामुळे या प्रकारच्या ग्रुपवर महिला किंवा महाविद्यालयीन तरुणींचीच संख्या आहे. याउलट पुुरुष मंडळी या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे यापासून ते कोसो दूर चालले आहेत.कारखान्यातून थेट घरीअनेकजण कारखान्यातूनच वस्तू खरेदी करतात. त्यामुळे बाजारभावापेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी दरात देणे त्यांनाही परवडते. तरीही चांगला मोबदला मिळत आहे. परंतु दर ठरवत असताना बाजारभावाचा विचार करावा लागतो. अन्यथा ग्राहक पुन्हा मिळत नाहीत.