शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

जिजामाता बँक ‘सील’

By admin | Published: December 14, 2015 11:52 PM

पोलिसांची कारवाई : घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पंचनामा

सातारा : जिजामाता सहकारी बँकेतील अपहारप्रकरणी लेखापरीक्षकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासून पंचनाम्याची कारवाई सुरू केली. बँक ‘सील’ करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जिजामाता बँकेच्या ‘राजधानी टॉवर्स’ येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात शाहूपुरी पोलिसांची वर्दळ दुपारी अडीचपासूनच सुरू होती. सुमारे चार वाजता छाप्याची कारवाई सुरू झाली. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, उपनिरीक्षक पी. बी. कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार शिंदे, हवालदार खरात, नाईक अजित घाडगे, डी. एस. कुंभार, एस. आर. देशमुख, एम. ए. वाघमळे, महिला कर्मचारी मीरा महामुनी, दीपा पवार यांचे पथक बँकेत दाखल झाले.लेखापरीक्षक तानाजीराव जाधव यांनी गुरुवारी (दि. १०) शाहूपुरी ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. बोगस नोंदी करून अपहार केल्याप्रकरणी अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा माडगूळकर, पती शिरीष कुलकर्णी यांच्यासह १९ संचालकांवर त्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या बाबींशी संबंधित कागदपत्रे आणि संगणकाच्या हार्ड डिस्क ताब्यात घेण्यास तसेच पंचनाम्यास सोमवारी सायंकाळी प्रारंभ केला. रात्री आठ वाजेपर्यंत कागदपत्रांशी संबंधित तपासणी सुरू होती. त्यानंतर हार्ड डिस्कसारखे डिजिटल पुरावे ताब्यात घेण्यास सुरुवात झाली, असे सूत्रांनी सांगितले. पुरावे ताब्यात घेऊन ‘सील’ करण्याची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)