सातारा : हजारो ठेवीदारांचे १०५ कोटी रुपये अडकलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या आदेशामुळे बँकेला बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत.बँकिंग रेगुलेशन कायदा १९४९ कलम २२ नुसार ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे बँकिंग व्यवहारासाठी दिलेला परवाना रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार, ठेवी जमा करणे किंवा परत करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅँकेने एका प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. एक हजार रुपयांच्या वरील ठेवीची रक्कम परत करण्यास यापूर्वीच निर्बंध घातले होते. आता दि. ३० जून २०१६ च्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्णयामुळे ठेवीदार आणखी अस्वस्थ झाले आहेत. ठेवीदारांच्या तब्बल १०५ कोटींच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात, या हेतूने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जिजामाता बँक ठेवीदार संघटनेने घेतला होता. (प्रतिनिधी)मुंबईकडे लक्षजिजामाता महिला बँकेचे ठाणे जनता बँकेत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी मुंबईत सहकार खात्याची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विलीनीकरणा-संदर्भात निर्णय होऊ शकतो.
जिजामाता महिला बँकेचा परवाना अखेर रद्द
By admin | Published: July 04, 2016 11:34 PM