येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्रा. अधिकराव कणसे यांच्या सेवागौरव व ज्ञानयात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात प्रा. अधिकराव कणसे व त्यांच्या पत्नी सुरेखा कणसे यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, माजी प्राचार्य सुहास साळुंखे, डॉ. अशोक करांडे, अॅड. जनार्दन बोत्रे, बाळासाहेब पाटील, प्राचार्य आर. के. भोसले, एल. जी. जाधव, डॉ. विजय माने, डॉ. अरुण गाडे, जे. ए. मेत्रे, डॉ. सुभाष शेळके, डॉ. महेश गायकवाड, डॉ. आर. जी. पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा ज्ञानमंत्र प्रा. अधिकराव कणसे यांनी घेऊन अनेक पिढ्या सुसंस्कृत केल्या. आपल्या सेवाकाळात त्यांनी गुणवत्तेची आणि मानवतेची मुद्रा उमटवली. मानवी जीवनात गुणवत्ता सिध्द करण्यासाठी प्रोत्साहनाची आणि संधीची गरज असते. संधीचे जे सोने करतात, ते लायक ठरतात.
यावेळी उपप्राचार्य मोहन पाटील, प्रा. पी. डी. पाटील, डॉ. जे. एस. पाटील, शरद चव्हाण, प्राचार्य बी. बी. सावंत, बाळासाहेब पाटील, ए. एम. गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य सतिश घाटगे यांनी स्वागत केले. प्रा. सुरेश यादव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.
फोटो : १०केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रा. अधिकराव कणसे यांच्या ज्ञानयात्री पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्याहस्ते करण्यात आले.