छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या पाटलाचे हातपाय कापून भविष्यात बलात्कार करणाऱ्याचे काेणाचेही धाडस झाले नाही पाहिजे, अशा स्वरूपाच्या शिक्षा छत्रपतींनी दिल्या होत्या. सावकारांना जरब बसावा म्हणून शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लागता कामा नये, असा आदेश दिला. यामुळेच शिवराज्य पुन्हा यावे असे आजही वाटते. याच वंशात जन्मलेले शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भाेसले हे नेहमी म्हणतात की, ‘मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून या सर्वाेच्च कुळात माझा जन्म झाला.’
छत्रपती उदयनराजेेंकडे सर्वसामान्य व दीनदुबळ्यांनी आपल्या समस्या घेऊन जायचे व महाराज त्याच्यावर लगेच ताेडगा काढणार. काेणाचे जमिनी बळकावण्याचे वाद, महिलेवर अत्याचार, गावगुंडाचा त्रास, अधिकाऱ्यांची अरेरावी, तर गरजूंना मदत याबाबत त्यांच्याकडून कधीच पुढची तारीख दिली जात नाही. अतिशय चाणाक्ष बुद्धीने जाे याेग्य त्याला जागेवरच न्याय व बदमाशाला त्यांच्या पद्धतीने दंड. या त्यांच्या स्वभावामुळे राेज राजेंच्या वाड्यावर हजाराे उपेक्षितांची गर्दी जमत असते. उदयनराजेंच्या स्वभावाबद्दल बाेलायचे झाले तर त्यांनी कधीच मी या घराण्यातील आहे म्हणून गर्व केला नाही. शेतकऱ्यांच्या पडक्या घरात जाऊन बसतील, तर कधी बांधावर जाऊन चटणी भाकरी खातील. आलिशान गाड्या असतानासुद्धा कधी रिक्षातून फिरतील, तर वेळेप्रसंगी चालतसुद्धा ज्येष्ठ दिसले तर चरणस्पर्श करणारच. बालगाेपाळांशी अगदी त्यांच्यासारखे खेळणारे म्हणजे उदयनराजे. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व हसतमुख. मात्र, काेणी डिवचले तर मात्र त्याची खैर नाही. मग पुढचा व्यक्ती काेणीही असाे.
त्यांच्या निर्भीड स्वभावातूनच त्यांच्यातील छत्रपती घराण्याचे दर्शन नेहमीच हाेत असते. उदयनराजे कधीही काेणाच्या सांगण्यावरून काेणतीही गाेष्ट करत नाहीत, तर काेणाच्या प्रभावालाही बळी पडत नाहीत. त्यांचे निर्णय ते स्वत: विचारपूर्वक घेतात. त्यांची दिशा ते स्वत:च ठरवतात. काेणाच्या मागे जात नाहीत. एकदा ठरवले की ठरवले म्हणूनच त्यांचा नेहमी एक डायलाॅग असताे ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, ताे फिर मैं अपने आप की भी नही सुनता.’
सुुरक्षिततेसाठी लाेक समूहाने यात्रा करतात. समूहाने यात्रा केल्याने संकटे येत नाहीत; परंतु हाच समूह तुमची ओळख काढून घेताे. कारण तुम्ही काेणाच्यातरी सांगितलेल्या मार्गावर चालत असता. आपला मार्ग बनवण्यासाठी एकट्याने चालावे लागते. समूहात तर तारेसुद्धा चालतात; परंतु पूजा त्या सूर्याचीच हाेते. ताे एकटा चालताे, त्याला त्रास सहन करावा लागताे. संकटाचा सामना करावा लागताे. स्वत:ला आगीत झोकून द्यावे लागते आणि तेव्हाच मिळते ओळख, तेव्हाच मिळतो सन्मान, अशा आपल्या सूर्यदेवास आदिशक्ती तुळजाभवानी उदंड आयुष्य देवाे हीच प्रार्थना...!
- सागर भाेसले, सातारा