शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जंगल पवनचक्क्यांच्या दावणीला!

By admin | Published: November 21, 2014 9:10 PM

परिसरातील बाहे-पाचगणी गावच्या हद्दीतील जंगल तोडण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही असा प्रकार सुरू

अरुण पवार - पाटण--मोरणा पठारावरील जंगलव्याप्त जागेत पवनचक्की कंपन्यांनी टॉवर उभारण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी वनविभागाशी सौदा करून जंगले ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी रिसवडसारखे अभयारण्य वनविभागाने पवनचक्की कंपन्यांच्या घशात घातले. आता त्याच परिसरातील बाहे-पाचगणी गावच्या हद्दीतील जंगल तोडण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही असा प्रकार सुरू आहे. येथील सुमारे २० हेक्टर परिसरातील झाडे तोडली जाणार आहेत. झाडे तोडण्याच्या ठेका वनविभागानेच घेतला असून, त्यास पाचगणी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण संतुलित ग्राम’ योजना राबवून शासन पर्यावरण निर्मितीसाठी झटत आहे, तर दुसरीकडे वनविभागच पर्यावरणाचा कर्दनकाळ बनून जंगले पवनचक्कीसाठी देत आहे. पाटणच्या मोरणा पठारावर हे प्रकार सुरू असून, रक्षकच भक्षक बनल्यामुळे या परिसरातील कोयना चांदोली अभयारण्याच्या सीमा धोक्यात आल्या आहेत. जंगलव्याप्त; पण हवेच्या ठिकाणी आहे म्हणून तो भाग पवनचक्की कंपन्यांना टॉवर उभारणीसाठी म्हणजेच पवनचक्की पाती उभी करण्यासाठी द्यायचा हा विचित्र सौदा वनविभागातर्फे सुरू आहे. यासाठी केंद्र शासनाच्या भोपाळ येथील विभागाकडून परवानगी आणली जात आहे. यामुळे स्थानिक विभागाचे काही चालत नाही. मुला-बाळांसारखी झाडे सांभाळायची आणि त्याच झाडांवर कुऱ्हाड चालवायची. सध्या वनविभागाचे कर्मचारी पवनचक्क्यांना वनजमिनी देत आहेत. पाचगणी गावच्या हद्दीत अशीच वृक्षतोड सुरू असून, वनसंरक्षण समितीला विश्वासात घेतले नाही. या प्रकारास आमचा विरोध आहे. - किसन सुर्वे, सरपंच===पाचगणी वनक्षेत्रातील १९.६१ हेक्टर क्षेत्र पवनचक्की कंपनीला देण्यात आले आहे. त्या बदल्यात कोकणातील सावर्डे येथील जमीन वनविभागाला मिळाली आहे. पाचगणीतील झाडे तोडून त्यांचा लिलाव केला जाणार आहे. - जी. एन. कोले, वनक्षेत्रपाल, पाटणकुठे गेले पर्यावरणवादी?पाटण भागात गेल्या काही वर्षांपूर्वी पर्यावरणवाद्यांनी चांगला दरारा निर्माण केला होता. मात्र पाटण तालुक्यातील जंगलव्याप्त भागात सध्या वृक्षतोड सुरू असताना याच पर्यावरणप्रेमींची तलवार म्यान झाल्याचे दिसते. अभयारण्यातील अतिक्रमणे, वृक्षतोड, पवनचक्क्यांची अतिक्रमणे याविरोधातील आवाज आता बंद झाला आहे.