सातारा : ‘कोण म्हणतंय मी पुण्यातून निवडणूक लढणार आहे. तर कोणी सांगतय नागपूर, सांगलीतून निवडणुकीत उतरणार; पण मी क-हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातच काम करून निवडणूक लढविणाार आहे,’ असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर्कांना पूर्णविरामदिला.काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पदग्रहण सत्कार समारंभ व पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘१९९९ मध्ये काँग्रेसची दोन शकले झाली. जिल्ह्यातही तशी परिस्थिती निर्माण झाली. सातारा जिल्ह्यात पक्ष कमी पडला; पण काँग्रेस विचारांची माणसे कमी नव्हती. जिल्ह्यात आघाडी करतानान्याय मिळाला नाही, हे खरे असले तरी आपल्यापुढे भाजपच्या रुपानेमोठा शत्रू उभा आहे. त्याला पराभूत करण्याची गरज आहे.पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ पक्षांची मोट बांधली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार दिले जातील. भाजपविरोधात अनेक जण एकत्र आल्याने हिंदी भाषिक पट्ट्यात पूर्वीपेक्षा खूप कमी जागा भाजपला मिळतील.शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवीदेशातील सत्ताधाºयांना राज्यघटना उद्ध्वस्त करायची आहे. पुन्हा सध्याचे लोक सत्तेवर आल्यास लोकशाही राहणार नाही व निवडणुकाही होणार नाहीत, असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘शेतकºयांची कर्जमाफी फसवी आहे.आम्ही सत्तेवर आलो तर किमान उत्पन्नाच्या हमीचा कायदा करू, तसेच सर्वांना समान स्थान देण्याचा प्रयत्न राहील.’
क-हाड दक्षिणमधूनच विधानसभा निवडणूक लढविणार; पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:26 AM