पेट्री : साताऱ्याला पाणीपुरवठा करत असलेल्या कास तलाव परिसरात दोन आठवड्यांत दोन ते तीन वेळा मोठा पाऊस आणि अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. तरीही पाणीपातळीत केवळ दीड फुटाने वाढ झाली. कास तलावात पाच फूट पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी यावेळी तलावात सात फूट पाणीसाठा शिल्लक होता.सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. मागील पंधरवड्यात कास तलावात केवळ साडेतीन फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा पडला आहे. साताºयाला अंतिम तिसºया व्हॉल्वद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून मध्यम स्वरुपात तसेच दोनवेळा जोरदार पाऊस पडला. या पावसाने तलावाच्या पाणीपातळीत दीड फुटाने वाढ होण्यास मदत झाली आहे.पावसाचा जोर अद्याप समाधानकारक नसल्याने सातारकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. सध्या तलावात पाणी पातळी वाढू लागल्याने पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने बराच कालावधी ओढ दिल्याने व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तलावात दोन फुटाने पाणीसाठा कमी शिल्लक आहे. मागील आठवड्यात दोन वेळा मान्सूनपूर्व पाऊस चांगल्या स्वरुपात पडला. तरीही तलावातील पाणी पातळीत वाढ झाली नव्हती; परंतु जमिनीची धर धरण्यास मदत झाली होती. त्यानंतर दोनवेळा चांगल्या स्वरुपात पाऊस झाल्याने तलावाच्या पाणीपातळीत आत्तापर्यंत दीड फुटाने वाढ झाली. अधूनमधून पाऊस पडत असला तरी दमदार पावसाची आवश्यकता आहे. तोपर्यंत सातारकरांनी पाण्याची काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. तरच पाणी पुरणार आहे.पाऊस पडेपर्यंत बचतीची गरजसध्या कास तलावात पाच फूट पाणीसाठा शिल्लक असून, दोनवेळा मोठ्या स्वरुपात पाऊस झाल्याने आत्तापर्यंत दीड फुटाने पाणीसाठा वाढला आहे. सातारकरांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरात लवकर मान्सूनचा पाऊस सुरू होणे आवश्यक आहे. तोपर्यंत नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन पाटकरी जयराम कीर्दत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कासचे पाणी गतवर्षीपेक्षा दोन फुटाने कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:03 PM