खटाव : धारपुडी (ता. खटाव) येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री कालिकामाता देवीची यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. परंतु, कोरोना महासंकटामुळे व शासनाच्या नियमानुसार यात्रा साध्या पध्दतीने साजरी केली जाणार आहे.
यात्रेसंदर्भात चर्चा करण्याकरिता कालिकामाता मंदिरात सर्व ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सालाबादप्रमाणे कालिकामाता देवीची यात्रा शुक्रवार, २ रोजी रंगपंचमी, एकनाथषष्ठीला पार पडत असते. यात्रेमध्ये फक्त मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी रीतिरीवाजानुसार करण्यात येतील. कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत, असा एकमुखी निर्णय ग्रामस्थांमधून घेण्यात आला आहे.
सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी, अशी पुजारी मंडळीकडून विनंती करण्यात येत आहे. बैठकीसाठी गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण वर्ग व पुजारी मंडळी उपस्थित होती.