कातर खटाव : खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे श्री कात्रेश्वराचा रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी पावणेबारा वाजता कदम महाराज व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथोत्सवास प्रारंभ झाला. सायंकाळी रथ पेठेतून जानाई मंदिरापंर्यत जाऊन परत सायंकाळी सात वाजता कात्रेश्वर मंदिराकडे आल्यानंतर रथोत्सावची सांगता झाली. रथोत्सवाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला रथोत्सवानंतर भाविकांना व यात्रेकरूंना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, कातरखटाव परिसरातील व गांवातील हजारो भाविक,भक्तांनी व लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कात्रेश्वर यात्रेत ३ लाख १५ हजार ४५३ रुपये भाविक-भक्तांनी रथावर अर्पण केले. दुष्काळात होरपळनाऱ्या भाविक, भक्तांचा यात्राकाळात उत्साह दिसून येतो. रात्री दहा वाजता लावण्यखणी नृत्याचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला शौकिनांची अलोट गर्दी दिसून आली. कात्रेश्वर यात्राकमेटी कातरखटाव, कात्रेश्वर ग्रुप, बेंगलोर, कात्रेश्वर ग्रुप, कातरखटाव, कात्रेवर ग्रुप, मुंबई, आणि सावली सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक संस्था या संस्थांनी एकोप्याने येऊन यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. (वार्ताहर) ‘हर हर महादेव’च्या गजरात गुलालाची उधळण करीत एस. टी. स्टँड चौकातून फटाक्यांच्या आतषबाजीत घोडे, लेझीम, हती, बँड बाजा, ढोल-ताशांच्या सुरात कात्रेश्वराची मिरवणूक निघाली. परिसरातील भविक, भक्तगण व ग्रांमस्थानी रथावर पैशांचे व नारळाचे तोरण अर्पण केले. कात्रेश्वराच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या होत्या. काही कॉलेज युवतींनी व महिलांनी रस्त्यावर भव्य सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. कात्रेश्वराच्या मिरवणुकीत गाव व परिसरातील भाविक, ग्रामस्थ सर्वजण एकोप्याने सहभागी झाले होते. गांवात पै-पाहुण्यांनी, चाकरमान्यांनी परिसर गजबजून गेला होता. आजूबाजूच्या गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी मिरवणुकीत गजीनृत्य, पिपानी नृत्य, बँजो नृत्य सादर करण्यात आले होते.
कात्रेश्वराचा रथोत्सव उत्साहात
By admin | Published: February 19, 2015 10:27 PM