सातारा : कोयना धरणामध्ये सध्या एकूण ७९.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सहा वक्र दरवाजातून ९ हजार ६२६ क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून २ हजार १६६ क्युसेक याप्रमाणे एकूण ११ हजार ७९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. जिल्ह्यात सोमवारी पहाटे आणि रविवारी दिवसभरात एकूण २९.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी २.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाची तालुकानिहाय माहिती, सातारा २.३ मिलिमीटर, जावळी २.३ मिलिमीटर, पाटण २.३ मिलिमीटर, वाई ०.३ मिलिमीटर, महाबळेश्वर २२.४ तर कोरेगाव, कºहाड, फलटण, माण, खटाव, खंडाळा तालुक्यात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणांचा सोमवारी सकाळपर्यंतचा एकूण पाणीसाठा दलघमीमध्ये पुढीलप्रमाणे, कंसात एकूण टक्केवारी. उरमोडी २५०.१० (८८.२८), धोम-बलकवडी ९७.४९ (८३.९१), तारळी १४०.२१ (८४.५९), नागेवाडी ३.१२ (४३.२२), मोरणा (गुरेघर) २६.३९ (६४.६९), उत्तरमांड १६.८९ (६७.०६), कुडाळी महू ४.५३ (१४.०९), कुडाळी हातगेघर २.५४ (३३.७४), वांग-मराठवाडी १७.६० (२२.५४), चिखली १.८८ (१००), जांभळी ०.०६ (०.६८), पांगारे २.७२ (१००), कुसवडे १.४६ (३९.५८), काळगाव २.६९ (१००), कण्हेर २५१.३० (८७.८७), धोम २५१.५३ (६५.७९). |
कोयना धरणातून ११ हजार ७९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:28 PM