शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

कराड पालिका : "पृथ्वीराजां" ची एन्ट्री, कोणासाठी धोक्याची घंटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:15 AM

Karad Prithviraj Chavan Satara : कराड पालिकेत दोन वर्षांनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एन्ट्री केली. त्यांच्या फंडातून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते झाले. चव्हाणांच्या स्वागताला राष्ट्रवादीसह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. पण काहींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पृथ्वीराज यांची एन्ट्री कोणासाठी धोक्याची घंटी आहे; याबाबत शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठळक मुद्देकराड पालिका : ''पृथ्वीराजां'' ची एन्ट्री, कोणासाठी धोक्याची घंटी ! रुग्णवाहिका स्वीकारली, पण राजकीय आजाराचं काय ?

प्रमोद सुकरेकराड : कराड पालिकेत दोन वर्षांनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एन्ट्री केली. त्यांच्या फंडातून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते झाले. चव्हाणांच्या स्वागताला राष्ट्रवादीसह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. पण काहींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पृथ्वीराज यांची एन्ट्री कोणासाठी धोक्याची घंटी आहे; याबाबत शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.पालिकेच्या गत निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी रिंगणात उतरली. खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचा जनशक्ती, यशवंत, लोकसेवा या तिन्ही आघाड्यांच्या नेत्यांना फायदा झाला. तांत्रिक अडचणीमुळे सर्वजण फक्त जनशक्ती आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामोरे गेले एवढेच !उमेदवार निश्चित करताना बऱ्याच घडामोडी घडल्या. अखेर उमेदवार निश्चित झाले. समोर राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी व भाजपचे उमेदवार असे तगडे आव्हान होते. चव्हाणांनी तळागाळापर्यंत उतरून प्रचार केला. जनशक्ती आघाडीला बहुमत मिळाले. नगराध्यक्ष मात्र भाजपच्या निवडून आल्या. निवडून आल्यानंतर बहुतांशी जनशक्तीच्या नगरसेवकांनी दोनच दिवसांत चव्हाणांकडे पाठ फिरवली. ती परवाच्या पालिकेतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमातही दिसून आली.आता चार वर्षांत कराडच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. वर्षभरावर पालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. इच्छुकांनी आत्तापासूनच जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण यांची पालिकेतील एन्ट्री म्हणजे येत्या निवडणुकीत ते सक्रिय होणार असल्याचे संकेतच मानले जातात. त्यामुळे गत निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली विजय होऊन दगाफटका करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.खरंतर पाठीमागच्या पालिका निवडणुकीत काहींनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हाताच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला होता. परंतु आघाड्यांच्या राजकारणात माहीर असलेल्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळी आघाडीचे राजकारण उतरवलं. पण निकालानंतर चव्हाणांना आपलं थोडं चुकलंच असं निश्चितच वाटलं असावं.आपल्याच नगरसेवकांनी आपल्याकडे पाठ फिरवली ही वस्तुस्थिती असतानाही पृथ्वीराज चव्हाण आणि चेहऱ्यावर काही दाखवले नाही .पालिका हा विषय त्यांनी जरा दूरच ठेवला. पण नुकतेच कार्यक्रमाच्या निमित्ताने पालिकेत येऊन त्यांनी टायमिंग शॉट मारल्याचे बोलले जात आहे. आता यापुढील काळात पालिकेच्या पिचवर ते काय काय खेळी करणार हे पहावे लागेल.यादव -पाटील गटाची अनुपस्थितीपालिकेत बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीतील गटनेते राजेंद्र यादव व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण पालिकेत आले असताना कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. पण आघाडीच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, नगरसेवक अतुल शिंदे आदींनी यावेळी आवर्जून हजेरी लावली होती .त्याचीही चर्चा सुरू आहे.रुग्णवाहिका खरेदीला उशीर का?गतवर्षी कोरोनाचे संकट आले तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी रुग्णवाहिकेसाठी कराड पालिकेला निधी दिला. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यावर त्याची खरेदी झाली आहे. त्यासाठीही स्वतः चव्हाणांना प्रशासनाला धारेवर धरावे लागले. तेव्हा कुठे त्याला गती आली. रुग्णवाहिका खरेदीला झालेला उशीर हा राजकारणाचा भाग असल्याची चर्चा शहरात आहे. पालिकेने रुग्णवाहिका स्वीकारली, पण येथील काही नगरसेवकांना झालेल्या राजकीय आजाराचं काय? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणKaradकराडSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण