पत्रकात म्हटले आहे की, संस्थेचे २१ हजार २०० सभासद आहेत. संस्थेचा एनपीए एक टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. २७ शाखांमधून संस्थेचे कामकाज सुरू असून, पैकी सोळा शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. बँकिंग क्षेत्रात वेगवेगळ्या नवनवीन सुविधा सभासद व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावर्षी आर्थिक धोरणात सुलभता आणल्याने, आलेल्या संकटावर मात करून योग्य नियोजन केल्याने संस्थेला यश मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच कोरोनाचे संकट, बँकावर आलेली बंधने, त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम या सगळ्यांमध्ये संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत चांगले काम केले आहे. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, शाखा सल्लागार, सेवक वर्ग, सभासद, कर्जदार यांचे मोठे योगदान आहे. संस्थेने कर्ज व ठेवीच्या बाबतीत व्याजाच्या नवनवीन योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा, असे आवाहनही मिनियार यांनी केले आहे. (वा. प्र.)