कराड शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी प्रबोधन सुरू आहे. पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी केलीच पाहिजे असे निर्देश मुख्याधिकारी डाके यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. आता त्यानंतर शहरातील नागरिकांचे लसीकरण गतीने होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने त्यांनी आज आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या केंद्रात दर दिवशी किती लोकांचे लसीकरण होते. याची माहिती घेतली. हा वेग वाढविण्यासाठी त्यांनी आणखी चार ठिकाणी लस देण्याची केंद्रे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत ही केंद्रे सुरू होतील असे ते म्हणाले.
कराड पालिका कोरोना लस देण्यासाठी चार केंद्रे वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:40 AM