कराड : येथील दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकची सन २०२३ ते २७ या कालावधीत साठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. जिल्हा निबंधक मनोहर माळी यांनी याची घोषणा केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव उपस्थित होते. बिनविरोध निवडणुकीमुळे बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, सुभाषराव एरम यांच्या कारभारावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रातील एक मुख्य अर्थवाहिनी म्हणून कराड अर्बन बँकेची ओळख आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई आदी जिल्ह्यात बँकेच्या ६२ शाखा कार्यरत आहेत. बँकेने ४५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळावर काम करणे प्रतिष्ठेचे मानले जाते.नूतन संचालक मंडळ पुढील प्रमाणे- सुभाष रामचंद्र जोशी, सुभाष शिवराम एरम, समीर सुभाष जोशी, स्वानंद प्रवीण पाठक ,श्रीरंग गणेश ज्ञानसागर, महिपती निवृत्ती ठोके, विजय कोंडीबा चव्हाण, विनीत चंद्रकांत एरम ,अनिल आप्पासाहेब बोधे, चंद्रकुमार शंकरराव डांगे, महादेव गणपती शिंदे, राहुल अरुण फासे, रश्मी सुभाष एरम, सुनिता दिलीप जाधव, राजेश विश्वनाथ खराटे, राजेंद्र नारायण कुंडले, शशांक अच्युतराव पालकर.
कराड अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध!, बँकेने पार केलाय ४५०० कोटींचा टप्पा
By प्रमोद सुकरे | Published: October 29, 2022 4:28 PM