इंधन दरवाढीविरोधात कराडला काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:54 PM2021-03-26T16:54:59+5:302021-03-26T16:57:16+5:30

congress Karad Satara- कऱ्हाड येथील तहसीलदार कार्यालयासमोर केंद्र सरकारचे कृषी विरोधातील कायदे; इंधन दरवाढ याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Karadla Congress symbolic hunger strike against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात कराडला काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

इंधन दरवाढीविरोधात कराडला काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देइंधन दरवाढीविरोधात कराडला काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

कऱ्हाड : येथील तहसीलदार कार्यालयासमोर केंद्र सरकारचे कृषी विरोधातील कायदे; इंधन दरवाढ याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने हे उपोषण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

देशामध्ये शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी हे उपोषण आयोजित करण्यात आली होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करीत हे उपोषण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, राजेंद्र पाटील, नगरसेवक इंद्रजीत गुजर, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, विवेक पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. आंदोलकांनी हातामध्ये घेतलेले निषेधाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

 

Web Title: Karadla Congress symbolic hunger strike against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.