शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कराडच्या युवतीचा पुण्यात गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:04 AM

कºहाड/नºहे : पुण्यातील झील महाविद्यालयात शिकणाऱ्या कºहाडातील युवतीचा प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे रविवारी उघडकीस आले. तिचा मृतदेह पुण्यातील ...

कºहाड/नºहे : पुण्यातील झील महाविद्यालयात शिकणाऱ्या कºहाडातील युवतीचा प्रियकराने गळा दाबून खून केल्याचे रविवारी उघडकीस आले. तिचा मृतदेह पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळून आला.सोनाली आनंदराव भिंगारदिवे (वय २३, मूळ रा. विजयनगर, ता. कºहाड, सातारा) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाडनजीक वियजनगर येथे राहणारे शिक्षक आनंदराव भिंगारदिवे यांची मुलगी सोनाली ही पुण्यात झील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. गत चार दिवसांपासून ती संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. वारंवार संपर्क करूनही संपर्क होत नसल्यामुळे वडील आनंदराव भिंगारदिवे यांच्यासह कुटुंबीय पुण्याला गेले. त्याठिकाणी त्यांनी बेपत्ता सोनालीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली. पोलीस चार दिवसापांसून बेपत्ता सोनालीचा शोध घेत होते.दरम्यान, झील महाविद्यालयानजीक असलेल्या एका इमारतीतील रूममधून उग्र वास येत असल्याचे परिसरातील नागरिकांना जाणवले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रविवारी खोली उघडून पाहिले असता, गळा चिरलेल्या स्थितीत युवतीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी ओळख पटविली असता संबंधित युवतीचे नाव सोनाली भिंगारदिवे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याबाबतची माहिती भिंगारदिवे कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले.दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सोनाली भिंगारदिवे ही संबंधित रूम भाडेतत्त्वावर घेऊन संशयित आरोपी सोमेश घोडके याच्यासोबत राहत होती, असे निष्पन्न झाले. तसेच त्या दोघांनी घरमालकाला आमचे लग्न झाले असल्याचेही सांगितले होते. मात्र, सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सोमेशने चाकूने सोनालीचा गळा दाबून खून केला.ही घटना सुमारे १९ फेब्रुवारीला घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, आरोपीने लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना आढळली आहे. त्यामध्ये त्याने खुनाचा खुलासा केला असून, मी स्वत:ही आत्महत्या करणार असल्याचे त्यात त्याने नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनालीचा खून केल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावून संशयित आरोपी फरार झाला आहे. पोलीस संशयित सोमेश घोडके याचा शोध घेत आहेत. अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाणे करीत आहे.