शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

कराडवाडीचे शहीद सुपुत्र जवान सुभाष कराडे अनंतात विलिन, अमर रहेचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:14 PM

लोणंद ,दि.  ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी कराडवाडीच्या सांजेच्या माळावर हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.कराडवाडी येथील जवान सुभाष लालासाहेब कराडे (वय ३५) हे भारतीय ...

ठळक मुद्देकराडवाडीत हजारोंच्या जनसमुदायाकडून अखेरचा निरोपशासकीय इतमामात अंत्यसंस्कार वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी माळावर लोटला हजारोंचा जनसमुदाय जवानांनी दिली मानवंदना, तीन फैरी झाडून सलामी कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

लोणंद ,दि.  ०६ : अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे शहीद झालेले कराडवाडीचे सुपुत्र जवान सुभाष कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी कराडवाडीच्या सांजेच्या माळावर हजारोंचा जनसमुदाय लोटला होता.

कराडवाडी येथील जवान सुभाष लालासाहेब कराडे (वय ३५) हे भारतीय सैन्य दलामध्ये इंजिनियरिंग युनिट १२० बिग्रेड ४६ मध्ये हवालदारपदी कार्यरत होते. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर टेंगा या सात हजार फूट उंचीवरील डोंगराळ भागात देशसेवा बजावत होते. त्यांना झोपण्यासाठी असलेल्या तंबूमध्ये ऊब देणाऱ्या शेगडीचा शुक्रवार, दि. ३ रोजी रात्री आठच्या सुमारास अचानक भडका उडाला. यामध्ये तंबूला लागलेल्या भीषण आगीत सुभाष कराडे गंभीर जखमी होऊन शहीद झाले.

शहीद सुभाष कराडे यांचे पार्थिव सोमवारी सकाळी नऊ वाजता कराडवाडी येथे आणण्यात आले. तेथे त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी एक तास पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर घरापासून कराडवाडी गावातून फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये जवान सुभाष कराडे यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा निघाली.

अमर रहे, अमर रहे, जय जवान, जय किसान, जब तक सूरज-चाँद रहेगा, सुभाष तेरा नाम रहेगा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. अंत्ययात्रा कराडवाडी, वाघोशी, फाटा येथून सांजोबाचा माळ येथे आणण्यात आली.

यावेळी कोल्हापूरचे चीफ वाय. राणा, जिल्हा सैनिक बोर्डाचे कर्नल आर. आर. जाधव, सुभेदार चंद्रकांत पवार व त्यांच्या जवानांनी मानवंदना देत तीन फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर भाऊ संजय, मुलगा सनी यांनी मुखाग्नी दिला.

प्रशासनातर्फे सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, दत्तानाना ढमाळ, हणमंतराव साळुंखे, मनोज पवार, दीपाली साळुंखे, उदय कबुले, तहसीलदार विवेक जाधव, सभापती मकरंद मोटे, राजेंद्र तांबे, शोभा जाधव, अनिरुध्द गाढवे, रमेश धायगुडे, गटविकास अधिकारी दीपा बापट, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, रामदास शिंदे, राजेंद्र नेवसे, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, बाळासाहेब शेळके, अशोकराव धायगुडे, सरपंच कुंडलिक कराडे उपस्थित होते.हृदय पिळवटून टाकणारा आक्रोशशहीद सुभाष कराडे यांचे पार्थिव सोमवारी कराडवाडी येथे आणल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले. पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :Forceफोर्सSadabhau Khotसदाभाउ खोत