शहरं
Join us  
Trending Stories
1
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
2
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
3
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
4
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
5
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
6
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
7
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
9
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
10
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
11
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
12
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
13
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
14
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
15
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
16
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
17
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
18
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने
19
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
20
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...

करंजोशीतील तरुणाचा छेडछाडीच्या कारणातून खून; नऊ जणांना अटक

By दत्ता यादव | Published: June 18, 2024 8:45 PM

अवघ्या चार तासांत गुन्हा उघड

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : करंजोशी, ता. कऱ्हाड येथील रोहिदास मारुती पन्हाळकर (वय २१) या तरुणाच्या खुनाचा अवघ्या चार तासांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांना यश आले. हा खून मुलीची छेड काढल्याच्या कारणातून झाला असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

ओंकार हणमंत पन्हाळकर (२०), निखिल रमेश पन्हाळकर (२२), रोहित मारुती पवार (२१, सर्व रा. करंजोशी, ता. कऱ्हाड), आदित्य नामदेव पवार (१८, रा. गडकर आळी, सातारा), साहिल जयसिंग पिंपळे (१९, रा. मालोशी, ता. पाटण), तेजस सचिन पन्हाळकर (२१, रा. करंजोशी, ता. कऱ्हाड), कुमार एकनाथ पन्हाळकर (२२, रा. करंजोशी), देवेंद्र बनाजी घाडगे (२८, रा. करंजोशी, ता. कऱ्हाड), एक विधी संघर्षग्रस्त बालक, अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

   नागठाणे, ता. सातारा येथे दि. १६रोजी रात्री आठ वाजता रोहिदास पन्हाळकर याला काही युवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर दोन तरुणांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या या प्रकरणाचा तपास सुरू केला. रोहित पवार, ओंकार पन्हाळकर या दोघांनी रोहिदास याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले होते. या दोघांकडे पोलिसांनी चाैकशी सुरू केल्यानंतर त्यांनी सांगितलेली हकीकत आणि गुन्हा घडलेल्या परिस्थितीमध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलिसांचा या दोघांवर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच या दोघांनी इतर तरुणांना सोबत घेऊन खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सातजणांना अवघ्या चार तासांत विविध ठिकाणांतून अटक केली. मुलीच्या छेडछाडीतून रोहिदास याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार सुधीर बनकर, विजय कांबळे, संजय शिर्के, आतिश घाडगे, नीलेश फडतरे, सचिन साळुंखे, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, मनोज जाधव, अमित माने, अरुण पाटील, सनी आवटे, अमित झेंडे, राजू कांबळे, अजय जाधव यांनी कारवाईत भाग घेतला. 

टॅग्स :Arrestअटक