कºहाडसह परिसरात गत आठ दिवसापासून अपवाद वगळता दररोज वळीव पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी दाटून येणारे ढग, असे वातावरण दररोज पहायला मिळत आहे. शनिवारीही दिवसभर कडक ऊन्हाचा सामना करावा लागला. दुपारनंतर वातावरण बदलले. ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची चिन्हे निर्माण झाली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरूवातीला हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. सध्या शहरातील कोल्हापूर नाक्यापासून कृष्णा नाक्यापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. जोरदार पावसामुळे हे काम ठप्प झाले असून सकाळपासून केलेल्या डांबरीकरणावरही पावसाचे पाणी साचले आहे. सुमारे दोन तास पावसाने झोडपून काढल्यामुळे शहरातील सखल भागात रस्त्यावर पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती.
कऱ्हाड परिसराला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:38 AM