शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

VidhanSabha Election 2024: आघाडीची ‘तुतारी’च; युतीकडून कऱ्हाड ‘उत्तर’ कुणाला?; बाळासाहेब पाटील षटकाराच्या तयारीत

By संजय पाटील | Published: October 18, 2024 12:27 PM

काँग्रेस ‘किंगमेकर’च्या भूमिकेत: विरोधात तिघांकडून ‘फिल्डिंग’

संजय पाटीलकऱ्हाड : कऱ्हाड उत्तरेत विजयी ‘पंच’ मारणारे बाळासाहेब पाटील षटकाराच्या तयारीत आहेत. मात्र, ‘तुतारी’ला कमळ भिडणार की घड्याळ, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. गतवेळी शिवसेनेने तर त्यापूर्वी भाजपने उमेदवार दिलेल्या या मतदारसंघावर यंदा अजित पवार गटासह शिंदेसेनेचा दावा असून, उमेदवार निश्चितीनंतरच येथील चित्र स्पष्ट होणार आहे.कऱ्हाड उत्तर मतदारसंघ हा आमदार बाळासाहेब पाटील यांचा गड मानला जातो. मात्र, २०१४ पासून भाजपनेही येथे चांगलीच साखरपेरणी केली आहे. २०१४च्या निवडणुकीत येथे बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे अशी तिरंगी लढत झाली.त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत धैर्यशील कदम यांनी धनुष्यबाण उचलला. मनोज घोरपडे यांनीही अपक्ष रिंगणात उडी घेतली. त्यामुळे दुसऱ्यांदा येथे तिरंगी लढत झाली. यंदाच्या निवडणुकीत येथील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘तुतारी’च्या विरोधात घड्याळ, धनुष्यबाण की कमळ असणार, हे चित्र उमेदवार निश्चितीनंतरच स्पष्ट होईल.

२०१९ची पुनरावृत्ती होणार का?

  • पक्षफुटीनंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी ‘तुतारी’ वाजवणे पसंत केले आहे. मात्र, भाजपच्या चिन्हावरून लढण्यासाठी मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ इच्छुक आहेत.
  • ही जागा भाजपला सोडली जाणार की, २०१९च्या फॉर्म्युल्यानुसार भाजपमधून आयात केलेला उमेदवार घड्याळ हाती घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काँग्रेस ‘किंगमेकर’च्या भूमिकेतकऱ्हाड उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेसची भूमिका ‘किंगमेकर’ ठरणारी आहे. गत निवडणुकांचा विचार करता काँग्रेसने आघाडी धर्म येथे पाळला होता. मात्र, मध्यंतरी मतभेद झाले आहेत. त्यामुळे उत्तरेत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कऱ्हाड उत्तर विधानसभा २०१९ची निवडणूक

  • बाळासाहेब पाटील : १,००,५०९
  • मनोज घोरपडे : ५१,२९४
  • धैर्यशील कदम : ३९,७९१

मतदार

  • पुरुष : १,५४,६२८
  • महिला : १,४९,८३१
  • तृतीयपंथी : ७
  • एकूण : ३,०४,४६६
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-north-acकराड उत्तरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपाBalasaheb Patilबाळासाहेब पाटील