कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या; मात्र अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअखेर १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ५ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान झाले. सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. रत्नागिरी गोडाउनमध्ये ही मोजणी होणार असून, पहिली फेरी सकाळी आठ वाजता सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये उंब्रज, खालकरवाडी, खुबी, चौगुलेमळा, निगडी,पार्ले, शेणोली, शेरे, हजारमची येथील मत मोजणी होणार आहे. दुसरी फेरी सकाळी नऊ वाजता सुरू होणार असून कार्वे, काले, कोपर्डे हवेली, पाल, पोतले, शिंदेवाडी-विंग, सैदापूर, तिसरी फेरी सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार असून कोणेगाव, गोळेश्वर, चोरे, जखिणवाडी, बनवडी, मरळी, रिसवड, विंग, शिरगाव, चौथी फेरी सकाळी दहा वाजता होणार असून, त्यामध्ये आबईचीवाडी, इंदोली, खराडे, तासवडे, नवीन कवठे, पेरले, भवानवाडी, भुयाचीवाडी, वडगाव उंब्रज, वराडे, शहापूर, शिवडे, हरपळवाडी, पाचवी फेरी सकाळी साडेदहा वाजता होणार असून खोडशी, गायकवाडवाडी, चिखली, तांबवे, बेलवडे हवेली, भोळेवाडी, म्हासोली, वडोली निळेश्वर, वहागाव, शिरवडे, साजूर, सहावी फेरी सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून, त्यामध्ये जिंती, अकाईचीवाडी, कालवडे, गमेवाडी, नांदलापूर, बेलदरे, भरेवाडी, म्होप्रे, येरवळे, वस्ती साकुर्डी, साकुर्डी या गावांची मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता सातव्या फेरीत ओंड, कोडोली, कोळे, चचेगाव, धोंडेवाडी, नांदगाव, मालखेड, मुंढे, साळशिरंबे, दुपारी बारा वाजता आठव्या फेरीत करवडी, केसे, पाडळी, बामणवाडी, बेलवडे बुद्रूक, वाठार, वारुंजी, शेळकेवाडी-म्हासोली, शेवाळेवाडी-उंडाळे, शेवाळेवाडी-म्हासोली, सवादे तर दुपारी साडेबारा वाजता शेवटच्या नवव्या फेरीत गोटेवाडी, गोवारे, घारेवाडी, घोगाव, घोणशी, वाघेरी, सुर्ली या गावांची मतमोजणी होणार आहे.
कऱ्हाडला नऊ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:34 AM