शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

कऱ्हाडला ‘हम सात-सात’चा नारा!

By admin | Published: March 14, 2017 10:50 PM

पंचायत समिती : राष्ट्रवादीच्या शालन माळी सभापती; उपसभापतिपदी विकास आघाडीचे रमेश देशमुख

कऱ्हाड : पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडी मंगळवारी झाल्या. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी ‘हम सात-सात है’ म्हणत गळ्यात गळे घातल्याने राष्ट्रवादीच्या शालन माळी यांची सभापतिपदी तर उंडाळकरांच्या तालुका विकास आघाडीचे रमेश देशमुख यांची उपसभापतिपदी निवड झाली.कऱ्हाड पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याच पक्ष किंवा नेत्याकडे बहुमत नसल्याने मंगळवारी होणाऱ्या सभापती, उपसभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे डॉ. अतुल भोसले उत्सुक होते. बाळासाहेब व उंडाळकर यांच्याकडे प्रत्येकी सात सदस्य संख्या होती. तर भाजपकडे सहा सदस्य होते. त्यामुळे कोणातरी दोघांना एकत्रित आल्याशिवाय गत्यंतर नव्हते. ‘हम सात-सात है’ की ‘मैत्रिपर्वाला’ उजाळा याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, मंगळवारी आजी-माजी आमदारांनी सात अधिक सात अशी बेरीज करीत सत्ता तर स्थापन केली. सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीच्या वतीने सभापतिपदासाठी शालन माळी यांचा तर उंडाळकर आघाडीच्या वतीने रमेश देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला. याचवेळी भाजपच्या वतीने सभापतिपदासाठी अर्चना गायकवाड यांचा तर उपसभापतिपदासाठी शुभांगी पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेसकडे सभापतिपदासाठी आवश्यक उमेदवार नसल्याने नामदेव पाटील यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. (प्रतिनिधी)