शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

कऱ्हाडला ‘सखीं’ची नोंदणी लवकरच

By admin | Published: February 13, 2015 12:01 AM

लाभ घेण्याचे आवाहन : नवीन वर्षात होणार बक्षीसांची लयलूट

कऱ्हाड : महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सखी मंच’ने नववर्षात दमदार पदार्पण केले असून, यावर्षीची कऱ्हाडची सदस्य नोंदणी लवकरच होणार आहे. अनेक दिवसांपासून नोंदणीसाठी महिलांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना ‘सखी मंच’ने यावर्षी सखींसाठी वेगवेगळ्या भेटवस्तूंचा खजिना आणला आहे. सभासद नोंदणी केवळ एकच दिवस होणार आहे. ‘लोकमत सखी मंच’ने महिलांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. तब्बल तेरा वर्षे ‘सखी मंच’ महिलांसाठी कार्यरत आहे. या तेरा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून या मंचने आपली ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळी बक्षिसे, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच समाजोपयोगी उपक्रमामुळे सखी मंचने समाजात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या वर्षातही ‘सखी मंच’ आपली समाजहिताची व महिला सबलीकरणाची भूमिका कायम ठेवून महिलांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी कार्यरत राहणार आहे. हे व्यासपीठ म्हणजे असंख्य सखींना मिळालेले एक मुक्त आकाश आहे. येथे प्रत्येक सखीने आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू येथे उलगडले आहेत. तसेच स्वत:चा आत्मविश्वासही वाढविला आहे. तेरा वर्षांत सखी मंचच्या सर्वच सोहळ्यात सातत्याने अग्रभागी असणाऱ्या कऱ्हाडच्या सखींची यावर्षातील प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. लवकरच ‘सखी मंच २०१५’ ची एकदिवसीय सदस्य नोंदणी होणार आहे. यासाठी सदस्य नोंदणी फी ३०० रुपये असणार आहे.जुन्या व नव्या सर्व सभासदांसाठी नोंदणी शुल्क नेहमीप्रमाणे अगदी कमी म्हणजे, फक्त ३०० रुपये असणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सभासदांना ५०० रुपये किमतीच्या हमखास गिफ्ट, सोबत १०० रुपये किमतीचे ‘माय डाएट बुक’, सुवर्णस्पर्श, जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलर्समार्फत तब्बल १ हजार १०० रुपये किमतीच्या बँगल्स मिळणार आहेत. (प्रतिनिधी)