शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

कऱ्हाडची करवसुली @ साडेआठ कोटी!

By admin | Published: March 30, 2017 3:04 PM

पालिका प्रशासनाकडून वसुलीचा धडाका : बेधडक कारवाईमुळे नागरिकांची पालिकेत गर्दी; अजुनही दोन दिवस अवधी; चेक स्विकारणे बंद

आॅनलाईन लोकमतकऱ्हाड : कऱ्हाड पालिकेकडून शहरात सध्या मालमत्ता जप्त करणे, नळकनेक्शन बंद करणे तसेच सील केलेल्या मालमत्तेचे लिलाव करणे अशी कारवाई केली जात आहे. यावषीर्चे चौदा कोटी रूपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गेल्या तीन महिन्यात पालिकेने केलेल्या कारवाईतून ८ कोटी ३० लाख ५० हजार १८१ रुपए कराची रक्कम जमा झाली आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिकेकडून होत असलेल्या कारवाईचा थकबाकीधारकांनी चांगलाच धसका घेतला आहे. पालिकेने यावर्षी १३ कोटी ९२ लाख २१ हजार २४८ रुपए इतकी करवसूली होणे गरजेचे आहे. यातील गेल्या तीन महिन्यात पालिकेकडून साडेआठ कोटी इतकी रक्कम वसूल झाली आहे. वसुलीमोहिमेत आतापर्यंत एकूण ८० मालमत्तांवर कारवाई केली होती. त्यापैकी ३६ जणांनी पैसे भरले तर अजूनही ४४ मालमत्तेधारक कर भरणे बाकी आहेत. तर नळ कनेक्शनच्या कारवाईत एकूण १८० नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यापैकी २८ जणांनी पैसे भरले असून १५२ जणांनी अद्यापपर्यंत पैसे भरलेले नाही.कऱ्हाड पालिकेमध्ये सध्या शहर तसेच वाढीव हद्दीतील थकबाकीधारकांकडून अद्याप ५ कोटी ६१ लाख ७१ हजार ६७ रुपए इतकी रक्कम अद्याप वसूल होणे बाकी आहे. यामध्ये मालमत्ताधारकांकडून ४ कोटी ४३ लाख ८८ हजार ८५ इतकी तर पाणीपट्टीधारकांकडून १ कोटी १७ लाख ८२ हजार ३८२ इतकी रक्कम आहे. नगरपालिकेत जमा करण्यासाठी थकबाकीदांकडे आता ३१ मार्चपर्यंत मुदत बाकी राहिली आहे. दोनच दिवस अवधी थकबाकीची रक्कम भरण्यासाठी राहिला असल्याने पालिकेत पैसे भरण्यासाठी थकबाकीदारांकडून गर्दी केली जात आहे. लवकरात लवकर रक्कम भरता यावी म्हणून थकबाकीदार चेक तसेच डीडीने रक्कम भरत आहेत. मात्र, पालिकेने आता चेक व डीडीने रक्कम स्विकारणे बंद केल्यामुळे थकबाकीधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.मार्च महिन्यात पालिकेने कऱ्हाड शहरासह वाढीव हद्दीतील थकबाकीदारांकडून दंडात्मक पद्धतीने केलेल्या वसुलीच्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली आहे. शहरासह वाढील हद्दीतील एकूण थकबाकीदारांपैकी निम्यांहून अधिक थकबाकीदारांनी संकलित कराची रक्कम पालिकेत भरली आहे. ज्यांनी अद्याप कराची रक्कम भरलेली नाही त्यांच्यावर पालिकेकडून कडक कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात एक अधिकारी, दोन कर्मचारी आणि एक पोलिस यांची टीम तयार करण्यात आली आहे. कारवाईसाठी ५५ जणांचे अकरा पथक तयार करण्यात आले आहेत. पालिकेच्या कर थकबाकीदारांमध्ये अनेक शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. पाणीपट्टी, घरपट्टी, वीजकर, अग्नीशामक, आरोग्यकर, सफाईकर अशा प्रकारच्या सात करांचा उपभोग घेऊन सुमारे लाखांच्या आसपास कर थकविल्या प्रकरणी मध्यंतरी नोटीसा देत अनेक शासकीय कार्यालयांवर देखील पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. वर्षभर पालिकेच्या सुविधांचा वापर करणाऱ्या थकबाकीदार व गाळेधारकांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशांवर आता कडक स्वरूपात कारवाई करण्याचा निर्णय पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतला आहे. थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी दोन दिवसाचा अवधी बाकी राहिला आहे. ३१ मार्चनंतर थकबाकीची रक्कम भरणाऱ्याकडून दंडात्मक रक्कम स्विकारली जाणार आहे. दरवर्षी चेक व डीडीच्या स्वरूपात थकबाकीधारक महिनाअखेर पैसे भरतात. मात्र, त्यांनी दिलेले धनादेश व डीडी हे महिला पूर्ण झाला तरी पेंडिंग राहात तसेच शेवटी बाऊन्स होतात. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी या दोन दिवसात कोणत्याही थकबाकीधारकांकडून धनादेश न स्विकारण्याच्या सुचनाही देण्यात आलेल्या आहेत. पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेच्यावतीने तीन महिन्यांपासून शहरात युद्धपातळीवर करवसुलीची मोहिम राबविल्यामुळे जास्तप्रमाणात पालिकेस करप्राप्त झाला. थकीत करासंबंधी कोणतीही गोष्ट ऐकूणन घेता कडक स्वरूपात कारवाई करण्याच्या सुचना वसुली अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांनी आपली थकबाकी रक्कम तात्काळ पालिकेत जमा करणे आवश्यक आहे.- विनायक औंधकरमुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका४४ मालमत्तांवर लिलावाची कारवाई

कऱ्हाड पालिकेतील २०१६-१७ या वषार्तील संकलित कराची रक्कम न भरणाऱ्या अशा ४४ मालमत्ताधारकांवर पालिकेच्यावतीने जप्तीची कारवाई केली आहे. सुमारे लाखो रूपयांचा कर थकविल्याप्रकरणी या थकबाकीधारकांच्या मालमत्ता पालिकेने सील केलेल्या आहेत. या मालमत्तांचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

कारवाईसाठी प्रभागनिहाय पथक

शहरात संकलित कराची रक्कम थकविणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी ५५ जणांचे अकरा पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून शहरासह वाढीव जागेत असलेल्या थकबाकीदारांकडील नळकनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्त करणे अशाप्रकारची कारवाई केली जात आहे. हे पथक सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कारवाई करीत आहे.पेठनिहायक जमा झालेली मालमत्ता रक्कम१) गुरूवार पेठ - ६१ लाख ५५ हजार १८९ रुपए२) बुधवार पेठ - ७१ लाख ५६ हजार ३९३ रुपए३) मंगळवार पेठ - ९० लाख ८७ हजार ५९७ रुपए४) रविवार पेठ - ४४ लाख ७६ हजार ६०७ रुपए५) शनिवार पेठ १ - ९७ लाख ५० हजार ७६० रुपए६) शनिवार पेठ २ - १ कोटी ४५ लाख २९ हजार ७४७ रुपए७) शनिवार पेठ ३ - १ कोटी १३ लाख ४४ हजार ७४२ रुपए८) शुक्रवार पेठ - २९ लाख ६५ हजार ९५३ रुपए९) सोमवार पेठ - ७१ लाख ५५ हजार ३६२पेठनिहायक जमा झालेली पाणीपट्टी रक्कम१) गुरूवार पेठ - १० लाख ५६ हजार १२८ रुपए२) बुधवार पेठ - ७ लाख ८८ हजार १५४ रुपए३) मंगळवार पेठ - १६ लाख ४१ हजार ८९६ रुपए४) रविवार पेठ - १२ लाख ४१ हजार ७२६ रुपए५) शनिवार पेठ १ - ११ लाख ९० हजार २५९ रुपए६) शनिवार पेठ २ - ११ लाख ६९ हजार ३५४ रुपए७) शनिवार पेठ ३ - ७ लाख ७३ हजार ४७८ रुपए८) शुक्रवार पेठ - ८ लाख १६ हजार ३३५ रुपए९) सोमवार पेठ - १७ लाख ५० हजार ५०१चेक बंद फक्त रोख रक्कम जमा करा !मार्च महिना पूर्ण होण्यास दोन दिवसांचा अवधी बाकी राहिल्याने या दोन दिवसांत मोठ्या संख्येने चेकने व्यवहार होणार असल्याची शक्यता लक्षात घेता दोन दिवसांत कोणतीही संस्था, शासकीय कार्यालय, थकबाकीधारकांकडून चेक स्विकारले जाणार नाहीत. त्यांनी आपली थकबाकीची रक्कम रोख पैशाच्या स्वरूपात जमा करावी अशा वारंवार सुचना करवसुली विभागातील कर्मचारी पैसे भरण्यासाठी येणाऱ्या थकबाकीधारकांना देताना दिसत आहेत.