शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

काशिनाथाच्या नावानं चांगभलं!

By admin | Published: March 11, 2015 10:53 PM

बावधनमध्ये उत्साह : बगाड यात्रेस भाविकांची अलोट गर्दी

बावधन : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधनची बगाड यात्रा ग्रामस्थांच्या अपूर्व उत्साहात पार पडली. बुधवारी (दि. ११) पहाटे छबिना संपल्यानंतर बगाडाचा गाडा सोनेश्वर येथे नेण्यात आला. सकाळी बगाड्या बाळासो बाबूराव गायकवाड यांना विधिवत स्नान घालून, सोनेश्वर व कृष्णामाईची ओटी भरून विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी दहाच्या दरम्यान बगाड्याचा बगाडाला टांगण्यात आले. यानंतर पाच ते आठ बैल जोड्यांच्या साह्याने बगाड रथ सोनेश्वर येथून बावधन भैरवनाथ मंदिरापर्यंत ओढत आणण्यात आला.ग्रामस्थ व भाविकांच्या गर्दीने सोनेश्वर ते बावधन या रथमार्गावर राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थ मंडळ बावधन यांनी बगाड शिस्तीने व नियोजन बद्ध पद्धतीने गावात पोहचण्याकरिता ट्रॉलीतून लाउडस्पीकरद्वारे सूचना केल्या. या नियोजनामुळे भाविकांना बगाडाचे दर्शन घेता आले. यात्रामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली. (वार्ताहर)