मसूर : कवठे (मसूर) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कऱ्हाड उत्तरचे भाग्यविधाते व सह्याद्री कारखान्याचे संस्थापक पी. डी. पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच लालासाहेब पाटील होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी विश्वास गणेशकर, कवठे शाखेचे व्यवस्थापक रामचंद्र कुंभार, नवीन कवठेचे उपसरपंच गणेश घारगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेबराव यादव, अशोकराव पाटील उपस्थित होते. यादिवशी शेतकरी बांधवांनी एकरी शंभर टन उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान याविषयी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील मार्गदर्शक डॉ. संजीव माने यांचे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचा गावातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी लाभ घेतला. ग्रामविकास अधिकारी संदीप निकम यांनी आभार मानले. (वा.प्र.)
फोटो ०३मसूर-एडीव्हीटी
कवठे येथे पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन लालासाहेब पाटील, अजय गोरड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.