कवठे : आज कवठे परिसरात जोशी विहीर ते वेळे या परिसरात सायंकाळी साडेपाच ते साडे सहा या वेळात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासूनच हवेमध्ये प्रचंड उकाडा होता व आभाळ झाकोळले होते. सायंकाळी जोरदार वारे व पाऊस सुरु झाला; परंतु थोडयाच वेळात वा-याचा वेग मंदावला आणि पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पडत होता . या पावसाने कोणतेही नुकसान झाले नसून दिवसाआड पाऊस पडत असल्याने हा नक्की पावसाळा आहे की उन्हाळा याबाबत लोकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच जोरदार वार्याने व वाकडा तिकडा येत असल्याने गटारे तुडुंब भरून गटारांचे पाणी लोकांच्या घरात घुसत आहे. या आठवड्यातील हा चौथा पाऊस असल्याने व जमीन थंड होत असल्याने पावसाळ्यासाठी आवश्यक असणारा उष्मा तयार न झाल्यास याचा पावसाळ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. परिणामी पावसाळी पाऊस कमी झाल्यास दुष्काळाचे सावट येऊ शकतात या भीतीने येथील शेतकरी चिंंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)
कवठे परिसराला अवकाळी पावसाने झोडपले
By admin | Published: May 21, 2014 1:02 AM