शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

मदत मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा

By admin | Published: September 04, 2016 12:13 AM

उदयनराजे भोसले : महामार्ग प्राधिकरणावर आगपाखड; समन्वय समितीच्या बैठकीत कारवाईच्या सूचना

सातारा : ‘हायवे हा ‘हाय वे’ नाही तो ‘डेथ वे’आहे, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही, इतके अपघात या महामार्गावर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. पीडिताला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत या अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीची (दिशा) बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपाध्यक्ष रवी साळुंखे आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला वाहतूक पोलिस विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच माणची धावपटू ललिता बाबर हिच्या कौतुकाचा ठरावही करण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे यांनी यावेळी प्रास्ताविक करून संगणकीय सादरीकरण केले. यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, ‘काळ्या यादीत असणारी लोकं महामार्गाचे काम करीत आहेत. जागोजागी मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण पुलांची कामे दिसून येतात. मग टोल कशासाठी द्यायचा, असा प्रश्न करून या महामार्गावर एकही अपघात झाला तर संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनी दोषी धरून कठोर कारवाई करावी. जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या अधिकाऱ्यांना कैदेत ठेवा,’ अशी सूचना केली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभाग प्रमुखांनी संगणकीय सादरीकरण करून आढावा दिला. शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधीकृषी खात्याच्या कारभाराची होणार चौकशी ! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून मागितलेली माहिती मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, ‘तालुकास्तरावर त्यांनी किती बैठका घेतल्या. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही. कृषी खात्याने केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. कृषी खात्याच्या कारभाराविषयी चौकशी नेमण्यात यावी. अधिकारी आणि पदाधिकारी यांनी समन्वय आणि सकामरात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करणे आवश्यक आहे. या जिल्ह्याने राज्याला दिशा दिली आहे. भविष्यात जिल्ह्याची आणखी मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले.कातकरी समाजाला घरकूल : जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पद भरतीची सूचना देण्यात आली आहे. कातकरी समाजाला घरकूल मिळण्याबाबत क्लस्टर पद्धतीने करता येईल का, याबाबत ‘डीआरडीए’ने अभ्यास करावा. फळबाग लागवड संदर्भातील तक्रारीबाबतचा अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. विविध शासकीय योजनांमध्ये काही बँकांची प्रगती चांगली आहे. अजूनही चांगले काम बँकांनी करावे,’ अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.