लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करून सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.येथील ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृहरक्षक दलाची मानवंदना स्वीकारून उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, आमदार आनंदरावपाटील, नगराध्यक्षा माधवी कदम आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या दºयाखोºयाचा लाभ घेऊन सह्याद्रीच्या पट्ट्यात येणाºया भागात मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे, किंबहुना देशातील सर्वाधिक धरण असलेला जिल्हा म्हणून साताºयाने नावलौकीक मिळविला आहे. दुष्काळी भागातही पाणी पोहोचवून जनतेच्या शेतात पाण्याचे पाट देऊन इथल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे काम शासनाने केले आहे.जिल्ह्यातील जनतेने या पुनर्वसनासाठी मोलाची साथ दिली, त्यातूनच राज्यात सर्वाधिक यशस्वी पुनर्वसन जिल्ह्यात झाले आहे. कृष्णा, तारळी, धोम बलकवडी, उरमोडी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, आंधळी, नागेवाडी, महिंद, कवठे-कवळे, वसना, वांगणा, पांगारे या प्रकल्पातून १ लाख ३९ हजार २३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातून २ लाख ५८ हजार २२९ हेक्टर जमीन सिंचनाखालीयेणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन८२ गावठाणांमध्ये होणार असून,आता पर्यंत ५७ गावठाणांतीलनागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत.राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी अतिशय नियोजनबध्द अशी लोकांचा सहभाग असलेली जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरू करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, ‘त्याचे दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. २०१६- १७ ला २१० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली असून, ६,७९७ कामे करावयाची होती. यापैकी ३,७८४ कामे पूर्ण झाली असून, ७२७ कामे प्रगतीपथावर आहेत. २०१६- १७ मध्ये ४४ गावे जलयुक्त झाली आहेत.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
एकत्र काम करुन जिल्हा अग्रेसर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:38 PM