शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

दाट धुक्यात हेडलाईट ठेवा सज्ज!

By admin | Published: July 04, 2017 1:42 PM

कास पठारावर पर्यटकांची रेलचेल वाढली; वाहनांचे अपघात होण्याची शक्यता

आॅनलाईन लोकमतपेट्री (जि. सातारा) , दि. 0४ : जागतिक वारसा स्थळ व आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणारे कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असून, हा परिसर संपूर्ण हिरवाईने नटला असून, सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहता तसेच ठिकठिकाणी फेसाळणारे धबधब्याचे नयनरम्य दृश्याचा स्वानुभव घेण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे. तसेच सध्या शहराच्या पश्चिमेस दिवसभर दाट धुके असून, समोरून आलेली वाहने दिसत नसल्याने आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे नाही, हे पाहणे अत्यावश्यक आहे. हेडलाईट सुरू असण्याअभावी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सातारा शहराच्या पश्चिमेस सातासमुद्रापार ओळख नेणारे कास पठार परिसरात गुलाबी थंडीचा आस्वाद तसेच सध्या सर्वत्र हिरवाईने नटलेले त्यातच सड्यावर ठिकठिकाणी नागमोडी वळणाने वाहणारे पाणी, भारतातील सर्वाधिक उंचीचा तीन टप्प्यांत कोसळला जाणारा वजराई धबधबा, अन्य इतर दूंद, एकीवसारखे कित्येक कोसळले जाणारे छोटे-मोठे धबधबे, सांडव्यावरून पाणी वाहत नयनरम्य नजराणा देणारा कास तलाव, तसेच कास -बामणोली परिसरातील मनाला मोहिनी घालणारे सर्वत्र निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच सुटीच्या दिवशी शेकडो वाहनांची वर्दळ या परिसरात चालू आहे. सातारा-कास-बामणोली मार्गावर ठिकठिकाणी धोकादायक वळणे असून, सध्या या परिसरात दाट धुक्याच्या दुलईसह बऱ्याचदा मुसळधार पाऊस पडत आहे. दिवसभर असणाऱ्या या दाट धुक्यात समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज यावा, यासाठी पर्यटकांनी आपल्या वाहनांची हेडलाईट सुरू करण्यासंदर्भात सावधान असणे अत्यावश्यक आहे. कारण कित्येकदा वाहनांची हेडलाईट सुरू नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होऊन एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिसरात फिरायला येणाऱ्यांनी आपापल्या वाहनांची हेडलाईट सुरू आहे की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे.बऱ्याचदा हेडलाईट सुरू नसल्याने समोरून येणारे दुसरे एखादे वाहन अगदी जवळ आल्यावर समजते. दरम्यान, वाहनांवर नियत्रंण ठेवणे अवघड जाते. तसेच ऐन वेळेस हेडलाईट सुरू असण्याअभावी समोरून आलेल्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात टाळता यावा, यासाठी वाहने रस्त्याकडेला घ्यावे तर रस्त्यालगत झाडांचा पालापाचोळा कुजून पडलेला असून, घसरट निर्माण झाली आहे. तसेच लाल मातीवरून वाहन घसरण्याची शक्यता अधिक आहे.

पोलिसांची हवी करडी नजर

सध्या कास पठार परिसरात फिरायला येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दिवसभर पावसाची रिमझिम त्यात दाट धुक्याची दुलई पाहता दूरवरून समोरून वाहन दिसत नाही. त्यात स्टंट अथवा हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून मोठ्या वेगाने वाहने चालविली जात असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची कायमस्वरूपी करडी नजर असणे अत्यावश्यक आहे.आपल्या चुकीमुळे समोरून येणाऱ्या वाहनाला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, तसेच भविष्यात अपघातासंबंधीची दुदैर्वी घटना टळावी, यासाठी वाहनचालकांनी दाट धक्यातून प्रवास करताना आपापल्या वाहनांची हेडलाईट दिवसा देखील सुरू ठेवणे आवश्यक आहे.- संस्कार मोहिते, पर्यटक ठाणे