शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
4
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
5
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
6
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
8
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
9
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
10
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
11
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
12
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
13
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
14
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
15
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
16
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
17
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
18
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
19
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
20
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल

मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत ठेवा

By admin | Published: March 10, 2015 11:16 PM

शरयू आसोलकर : जागतिक महिला दिनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत मार्गदर्शन

कुडाळ : ‘स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास’ या पंक्तींप्रमाणे आजच्या स्त्रीने आपण स्त्री म्हणून स्वत:ला कमी न समजता चित्रकार जसा आपल्या चित्रासाठी अवकाश निर्माण करतो, तसे अवकाश स्त्रियांनी निर्माण करावे. मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राखणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. शरयू आसोलकर यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिन संत राऊळ महाराज कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख प्रा. शरयू आसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जयवंत यादव, अ‍ॅड. तृप्ती वालावलकर, डी. एस. हळदणकर, एस. एस. मालवणकर, संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै बी.एड.् कॉलेजच्या प्राचार्या डॉ. दीपाली काजरेकर, डीटीएड्च्या प्राचार्या सरोज दाभोलकर, सीबीएस्ई प्राचार्या शिल्पा मराठे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागराज सुनगार आणि कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या रूपाली नार्वेकर, अमृता गाळवणकर उपस्थित होत्या. जयवंत यादव म्हणाले, वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांच्यावर टाकण्यात आलेला दबाव दूर करण्यासाठी आणि त्यांना मानसन्मान देण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले. त्याचेच फळ म्हणून आज स्त्रियांना मताचा अधिकार मिळाला. इतकेच नाही, तर त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले. यापूर्वी फक्त पोटगीचाच अधिकार स्त्रियांना होता; परंतु आता वारसा हक्काचाही अधिकार कायद्याने मिळून पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला आहे, असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही भाषण केले. (प्रतिनिधी)शरीरस्वास्थ्य जपाप्रत्येक स्त्रीने स्वत:चे मनस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य जपावे. एकमेकांबद्दल भगिनीभाव जपावा, असे सांगून आद्य कवयित्री महदंबापासून लक्ष्मीबाई टिळक ते बाबूराव बागूल यांच्या कादंबरीतील जानकी इथपर्यंतचा आढावाही डॉ. शरयू आसोलकर यांनी घेतला.