शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सुनेचा संसार राखतेय सासू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:05 AM

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे अनेक विस्थापित शिक्षिकांची दूर गावी बदली ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे अनेक विस्थापित शिक्षिकांची दूर गावी बदली झाली. नोकरीच्या ठिकाणाहून रोज ये-जा शक्य नसणाऱ्या अनेक शिक्षिकांना त्यांच्या सासूने आधार दिला. दूर गावी गेलेल्या सुनेचा संसार राखण्याचं काम या मायमाऊली थरथरत्या हाताने करत आहेत, हे विशेष!सासू-सुनेचं नातं समाजमनात अजूनही विळ्या भोपळ्यासारखं असल्याचं भासवलं जातं. या नात्यात स्पर्धा आणि इर्षा असल्याचंही रंगविण्यात येतं; पण सासरची आई म्हणून सासुबाई सुनेच्या अपरोक्ष वाढलेल्या वयातही तिच्या सुनेचा संसार तितक्याच नेटाने करते, असे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील शिंगणवाडी या शाळेचा १३ पट आहे. शाळेवर दोन शिक्षक आहेत. यातील शबनम कवठेकर या शिक्षिका फलटण तालुक्यातून पाटणला आल्या. शनिवारी सकाळची शाळा उरकून त्या गावी जातात. शनिवार संध्याकाळ आणि रविवार दिवसभर कुटुंबासमवेत राहिल्यानंतर सोमवारी पहाटे त्या मार्गस्थ होतात. जंगलवाडी शाळेत असलेल्या सरस्वती भोईटे याही विस्थापित होऊन फलटणहून पाटणला आल्या. सुमारे साडेतीन किलोमीटर चालून डोंगर चढणं आणि उतरणं त्यांना अशक्य असल्यामुळे त्या सलग सुटी असेल तेव्हाच घरी जातात.शाळेच्या ठिकाणी आल्यावर ग्रामस्थांच्या सोबतीनं या महिला शिक्षिका राहतात; पण त्यांचे सर्व लक्ष सव्वाशे-दीडशे किलोमीटरवरील त्यांच्या कुटुंबाकडेच असतं. या दरम्यान मुलांचं आजारपण, स्नेहसंमेलन, पै पाहुण्यांचे कार्यक्रम आणि अन्य सर्व गोष्टींची जबाबदारी या शिक्षिकांच्या वयस्क आणि थकलेल्या सासुबाई समर्थपणे सांभाळत आहेत. घरात असलेल्या ज्येष्ठांच्या जीवावर अख्खा संसार टाकून इतरांच्या मुलांना सज्ञान बनवण्याचं बळ या शिक्षकांना येथूनच मिळत आहे. मुलांना शहाणं करताना आपल्या लेकरांच्या गुणवत्तेकडं होणारं दुर्लक्ष पाठीवर घालून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.‘तू नको ना जाऊस’!‘विक एण्ड मॅरेज’ची संकल्पना नाईलाजास्तव जगणाºया अनेक मातांना ‘ब्रुटल मंडे’ सतावतो. आई जाणार म्हटल्यावर चिमुरड्यांची झोपच उडते. आई आवरून बाहेर पडायला लागली तर छोटी मुलं तिचा पदर पकडून ‘आई तू नको ना जाऊस,’ अशी आर्जव करतात. कौटुंबिक कर्तव्याबरोबरच विद्यार्थी घडविण्याचं काम करणाºया या माऊली लेकरांना ‘येते लगेच’ असं सांगून बाहेर पडतात, ते थेट पाच दिवसांनी पुन्हा येतात. आई गेल्याच्या दिवशी फोनवर आई बोलत नाही तोवर मुलं अन्नत्यागही करतात.आजारी पालकअन् एकटी पत्नीपाटण तालुक्यातील पाठवडे येथे अनिल कोळेकर यांची बदली झाली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब नांदल, ता. फलटण येथे वास्तव्यास आहे. कोळेकर यांचे वडील १९७१ च्या युद्धात होते. त्यावेळी त्यांच्या पोटात गोळी लागून एक किडनी निकामी झाली. सध्या ते ८० वर्षांचे आहेत. घरात कोळेकर यांची आई, पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. वाढत्या वयोमानानुसार युद्ध सैनिक गनर कोंडिबा कोळेकर अंथरुणाला खिळून आहेत, त्यांच्या पत्नीला गुडघ्यांचा त्रास आहे.