शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Satara: केळवलीच्या तरुणाचा मारहाण करून खून, दोघेजण ताब्यात 

By नितीन काळेल | Published: June 29, 2024 7:06 PM

जुन्या भांडणातून खून झाल्याचा संशय..

सातारा : केळवली, ता. सातारा येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करुन खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणातून खून केला याची माहिती पोलिस घेत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धोंडिबा जांगळे (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो २६ जूनपासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ बाबूराव जांगळे (रा. केळवली, सध्या रा. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली होती. त्यानंतर पोलिस तसेच नातेवाईकही रमेश जांगळे याचा शोध घेत होते. मात्र, दोन दिवस तो कोठे आढळून आला नाही. मात्र, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रमेशचा मृतदेह परळी-केळवली रस्त्यावरील नित्रळ गावच्या हद्दीत मोरीच्या सिमेंटच्या पाईपमध्ये आढळून आला. मृताच्या अंगावर जखमा होत्या. अज्ञाताने मारहाण करुन खून केल्याचे दिसून आले. त्यामुळे याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच याप्रकरणी शनिवारी पहाटेच्या सुमारास मयताचा भाऊ बाबूराव जांगळे यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला.जुन्या भांडणातून प्रकार झाल्याचा संशय..या खुनप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शनिवारीही पोलिस तपासासाठी गेले होते. याप्रकरणात दोघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे. जुन्या भांडणातून मारहाण करुन खून केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आलेले आहे. तरीही खरे कारण अजून समोर आलेले नाही. तसेच या घटनेत कोणते हत्यार वापरले याचाही पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस