शिरवळ : खंडाळा तालुक्यातील केसुर्डी याठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी लोखंडी शस्त्रासह स्प्रेने हल्ला केला. यामध्ये बांधकाम व्यवसायिकासह तिघे जण जखमी झाले. हा हल्ला हल्ला रविवारी सायंकाळी झाला.बांधकाम व्यावसायिक रवींद्र अमृत ढमाळ (वय ३६), हृषिकेश सुनील यादव (२१, दोघे रा. केसुर्डी), रोशन भीमराव थोपटे (२५, रा. पिंपरे खुर्द ता. पुरंदर जि. पुणे) असे किरकोळ जखमी झालेल्यांचे नाव आहेत.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, केसुर्डी येथील बांधकाम व्यवसायिक रवींद्र ढमाळ हे आशियाई महामार्गालगत असलेल्या कार्यालयाबाहेर हृषीकेश यादव, रोशन थोपटे यांच्याबरोबर रविवारी सायंकाळी चर्चा करत बसले होते. यावेळी अचानकपणे दोन-तीन दुचाकीवरुन सात ते आठ युवक तोंडाला रुमाल बांधून तेथे आले.त्यांनी ढमाळ यांच्यावर लोखंडी हत्याराने व स्प्रेने हल्ला चढवला तर सोबत असलेल्या ऋषीकेश यादव याच्यावर स्प्रे मारत लोखंडी हत्याराच्या बोथट बाजूने हल्ला केला. रोशन थोपटे याने संबंधित हल्लेखोरांवर दगडाने हल्ला चढवल्याने तो थोडक्यात बचावला. यावेळी झालेल्या हल्ल्यामध्ये रवींद्र ढमाळ जखमी तर हृषीकेश यादव, रोशन थोपटे किरकोळ जखमी झाला.या हल्ल्याची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी गेले. तत्पूर्वीच हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले होते. जखमी रवींद्र ढमाळ यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करत उपचार करण्यात आले.शिरवळ पोलीस स्टेशन व रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. शिरवळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.
केसुर्डीत मारामारी : स्प्रे हल्ला करुन बांधकाम व्यावसायासह तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:44 PM
खंडाळा तालुक्यातील केसुर्डी याठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी लोखंडी शस्त्रासह स्प्रेने हल्ला केला. यामध्ये बांधकाम व्यवसायिकासह तिघे जण जखमी झाले. हा हल्ला हल्ला रविवारी सायंकाळी झाला.
ठळक मुद्देस्प्रे हल्ला करुन बांधकाम व्यावसायासह तिघांना मारहाणकेसुर्डीत मारामारी : शिरवळ पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा