उंब्रज : पिवळा धमक भंडारा व खोबºयाचे तुकड्यांची उधळण करत, लाखो वºहाडी मंडळींच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मुखवट्यांचा अनोखा विवाह सोहळा शुक्रवारी पाल येथे गोरज मुहूर्तावर पार पडला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार...’ चा जयघोष, खोबºयाच्या तुकड्यांसह पिवळ्या धमक भंडाºयाची उधळण, सूर्यास्ताची किरणे यामुळे विवाहाच्या बोहल्यासह संपूर्ण पालनगरी जणू सोन्याची नगरी झाली.
खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो वºहाडी भाविक शुक्रवारी पाल येथे दाखल झाले होते. संपूर्ण यात्रा कालावधीत कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी महिनाभरापासून केली होती.
या विवाह सोहळ्याला गुरुवारी रात्रीपासून वºहाडी भाविक पालमध्ये दाखल होऊ लागले होते. भाविकांना खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्याचे व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने देवळात दर्शनबारीची खास सोय केली होती. यात्रेकरुंसाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आदी सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी येणाºया भाविकांसाठी उंब्रज, सातारा, कºहाड, पाटण येथून एसटी महामंडळाने ज्यादा बसेसची सोय केली होती. तर शिरगाव, हरपळवाडी मार्गावर खासगी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती.
प्रशासनाच्या वतीने यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी ज्यादा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व सेवा सुविधांसह पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने आपत्कालीन जलद कृती दल, जमाव नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. महत्त्वाच्या ठिकाणी गर्दीवर नजर ठेवण्यासाठी वॉच टॉवरवर पोलीस तैनात केले होते. या ठिकाणावरून पोलीस यात्रेकरुंना माईकवरून सूचना करत होते. पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर परिसरापासून काही अंतरावर बॅरिकेटस लावण्यात आली होती.
यामुळे मंदिर परिसर पूर्णत: मोकळा झाला होता. याशिवाय आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामक दलाची पथके, आरोग्य विभाग पथके, रुग्णवाहिका, सज्ज ठेवली होती. तर आत्पकालीन उपयोगासाठी पाल-वडगाव-इंदोली मार्ग पूर्णत: मोकळा ठेवला होता.
विविध जिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनी दक्षिण वाळवंटात सकाळच्या जेवणासाठी चुली मांडून स्वयंपाकाची तयारी केली होती. या वाळवंटात वाघ्या-मुरळी यांचा खेळ चालू होता. परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या पूर्ण सागवानी स्वमालकीच्या रथातून मिरवणुकीची सुरुवात कºहाड पंचायत समितीचे माजी सभापती व प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून झाली. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील प्रमुख मानकरी हे आपल्या मानाच्या गाड्यासह आले होते. यात्रा कालावधीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.वºहाडी मंडळींचा मानपानाचा विधीदेवळात आरती झाली आणि प्रमुख मानकरी देवराज पाटील खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. ‘येळकोट येळकोट.. जय मल्हार,’ असा जयघोष करीत भाविक या मिरवणुकीवर भंडारा, खोबºयांची उधळण चोहोकडून करत होते. ही शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात (बोहल्यावर) पोहोचली. नंतर वºहाडी मंडळींचा मानपानाचा विधी उरकण्यात आला.
यात्रेच्या कालावधीत आगीसारखे प्रकार घडू नये, म्हणून अग्निशामक बंब बोलावण्यात आले होते. तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने आपली अग्निशमन यंत्रणा वाळवंटात बसवली होती. घटनास्थळी अग्निशामक बंब पोहोचण्यास विलंब झाला तर थेट नदीपात्रातील पाणी पंपाच्या साह्याने उचलून आग विझवण्यात येईल, अशी यंत्रणा शुक्रवारी पाल येथे ‘सह्याद्री’च्या माध्यमातून बसवलेली होती.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कºहाड तालुक्यातील पाल येथील खंडोबाच्या यात्रेचा शुक्रवारी मुख्य दिवस होता. यावेळी मंदिरातून निघालेल्या रथावर लाखो भाविकांनी भंडारा व खोबऱ्याची उधळण केली.