कोरेगाव : छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या आदेशाने १८ मार्च १७३३ रोजी शाहू महाराजांचे एकनिष्ठ विश्वासू सरदार खंडेराव बर्गे यांनी रायगड किल्ला दुष्मनांच्या हातून स्वराज्यात सामील करून घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याचे औचित्य साधून सरदार बर्गे मंडळींच्यावतीने दर वर्षी किल्ले रायगडावर १८ मार्च रोजी खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून ‘खंडेराव शौर्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरेगाव येथील श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने सुलतानवाडी (शौर्य भूमी) येथे पानिपत स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, ‘ऐतिहासिक कोरेगाव’ या ग्रंथाचे लेखक व राजश्री श्रीमंत हरजीराजे बर्गे सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंग सुतार, अॅड. चंद्र्शेखर बर्गे, युवराज बर्गे, बिपीन फाळके, राहुल बर्गे, सुरेश बर्गे, सुलतानवाडीचे उपसरपंच सुनील बर्गे, इतिहास अभ्यासक राहुल भोईटे (तडवळे), अमित फाळके (फाळके) आदी उपस्थित होते.
दिनेश बर्गे म्हणाले, ‘छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या आदेशाने १८ मार्च १७३३ रोजी शाहू महाराजांचे एकनिष्ठ विश्वासू सरदार खंडेराव बर्गे यांनी रायगड किल्ला दुष्मनांच्या हातून स्वराज्यात सामील करून घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याचे औचित्य साधून सरदार बर्गे मंडळींच्यावतीने दरवर्षी किल्ले रायगडावर १८ मार्च रोजी खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून ‘खंडेराव शौर्यदिन’ साजरा करावा. बर्गे यांनी मांडलेल्या या सूचनेला सर्वांनी अनुमोदन देऊन ‘खंडेराव शौर्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. अॅड. बर्गे यांनी पानिपतच्या रणसंग्रामाविषयी सविस्तर माहिती देऊन या लढाईत बर्गे घराण्यातील शूर मंडळींचाही सहभाग होता असे सांगितले. दरम्यान, गोरक्षण, व्यसनमुक्ती, किल्ले संवर्धन, नाणी अभ्यास आणि संग्रहात देत असलेल्या योगदानाबद्दल सचिन भगत यांचा श्रीमंत राजश्री हरजीराजे बर्गे सरकार प्रतिष्ठानच्यावतीने माजी नगराध्यक्ष बर्गे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.