शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

खंडाळ्यातील खरीप हंगाम बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 6:24 PM

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देनीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यातील गावांतशिवार पुन्हा फुलल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात पाणीनीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस

खंडाळा : नीरा देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहचल्याने खरीप हंगाम बचावला आहे . नीरा देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा एकदा फुलल्याचे पहायला मिळत आहे.

या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावनी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावामध्ये व परिसरात पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागली होती, त्यामुळे मोर्वे येथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा- देवधर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७ वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.

खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आलेली होती, या मागणीनुसार नीरा- देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगष्ट पासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.त्यातच नीरा- देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा- देवघर, भाटघर या धरणामधुन मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डावा व उजवा कालव्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा - देवघरच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागल्याने नीरा- देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुकयातील वाघोशी, अंदोरी,कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतक?्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असुन पाण्याअभावी जळु लागलेल्या पिकांना देखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरानी मोठी गर्दी केली होती.मकरंद पाटलांच्या प्रयत्नामुळे काम मार्गीतालुक्यातील अकरा गावातील ग्रामस्थांच्या मागणी नुसार व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मोर्वे येथे कालव्यावर तात्पुरता पुल उभारून नीरा -देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले होते, परंतु यावेळी पाणी वाघोशी, कराडवाडी, परिसरात पोहचल्यानंतर लगेचच बंद करण्यात आले होते. मात्र पाणी बंद केल्याने ते अंदोरी गावच्या शिवारात पोहचु शकले नव्हते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती.