सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.ग्रामसभेच्या सुरुवातीलाच सतरापैकी पाच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेत विविध शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना समजावी. तसेच ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी विषय वाचनास सुरुवात झाली. त्यावेळी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रश्नावर समर्पक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामसभा अर्ध्यावर सोडावी लागल्याची चर्चा सुरू आहे.विरोधकांनी घरकूलच्या प्रश्नावर चर्चा करण्यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी सूचना केली होती. परंतु, त्याला उत्तरे नसल्याने सत्ताधाºयांना काढता पाय घ्यावा लागला. ग्रामसभेला सुरुवात करण्यापूर्वीच सरपंच तसेच ग्रामविकास अधिकाºयांनी ग्रामसभा शासकीय मुद्यावर असल्याचे सांगितल्याने विरोधक आक्रमक बनले.ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थितीसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सरपंचांनी दिलेले उत्तर तसेच आठ दिवसांपूर्वी घरकूल संदर्भात लेखी अर्ज देऊनही कोणतेही उत्तर देण्यास टाळाटाळ सरपंच व ग्रामविकास अधिकारी करत असल्याने विरोधक नाराज होऊन आक्रमक बनले. कोणत्याही मुद्यावर चर्चा न होता ही ग्रामसभा गुंडाळल्यामुळे विरोधकांनी ग्रामविकास अधिकाºयांना कोणत्याही प्रकारचे इतिवृत्त पूर्ण न करण्याचे लेखी निवेदन दिले. कोणासही विश्वासात न घेता ग्रामसभा कागदोपत्री दाखवून बोगस कारभार करणाºयांचा निषेध करत आहोत.- राहुल पाटील,अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठानलग्न तिथीमुळे सदस्य अनुपस्थितविकासाचा मुद्दा नसल्याने लोकांमध्ये चुकीचा मेसेज जावा, यासाठी हे काम सुरू आहे. विरोधकांच्या या गोष्टींमुळे विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. लग्नतिथी तसेच बुद्धपोर्णिमा असल्याने ग्रामपंचायत सदस्यांची अनुपस्थिती होती. राजीनामे मागण्यापेक्षा आगामी निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी टीका उपसरपंच बबनराव घाडगे यांनी केली.ग्रामसभा ही नियमानुसारच झाली आहे. विषय पत्रिकेतील विषयांवर वाचन करण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळास सुरुवात केली. वास्तविक विरोधकांना एवढे तरी माहीत असणे गरजेचे आहे की, गावच्या विकास कामावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा हे माध्यम आहे. परंतु विरोधकांनी राजकीय आखाडाच समजून गोंधळ घातला.- सुवर्णा पवार, सरपंच, खटाव
खटाव ग्रामपंचायत सभेत आरोप-प्रत्यारोप-विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:52 PM
सातारा : कोणत्याही ठरावावर कसलीही चर्चा न करता ग्रामसभा गुंडाळण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात चांगलेच वातावरण तापले होते. दरम्यान, विरोधकाकडून अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअनुपस्थित सदस्यांकडून राजीनाम्याची मागणी