सातारा : वाढदिवसाची पार्टी म्हणजे धम्माल मस्ती, नुसता राडा. पण हा राडा केल्यानंतर लेकरांना दमायला होतं. लेकरांचं हे दमणं आपण अद्यापही उद्या वाटेल इतकं बरं सहज आणि सोपं घेत होतो; पण साताऱ्यातील ठक्कर कुटुंबीयांनी वाढदिवस साजरा करून दमलेल्या लेकरांना रिटर्न गिफ्ट म्हणून चक्क मसाज थेरपीसाठी नेलं आणि दमलेली ही लेकरं पुन्हा बागडू लागली.याविषयी अधिक माहिती अशी, साताºयातील ठक्कर कुटुंबीयांच्या कन्येचा तेरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे निश्चित करण्यात आलं. वाढत्या वयातील या मुलांना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ‘नाईट आऊट’साठी न्यायचं, फुल्ल धम्माल आणि दंगा करण्याचं निश्चित झालं. वाढदिवसाचं ठिकाण आणि वेळ सगळं ठरल्यानंतर विषय आला रिटर्न गिफ्ट काय द्यायचं?.कुटुंबातील प्रत्येकानेच काही पर्याय सुचविले; पण बोलता बोलता अचानक रात्रभर खेळून मुलं दमणार, हे वाक्य सदस्यांनी उच्चारलं. या वाक्याचा आधार घेत ही चर्चा पुढे वाढली. वाढदिवसाच्या आदल्या रात्री मुलं आल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना सकाळी रिलॅक्सेशन थेरपीसाठी नेऊ, असा पर्याय पुढे आला. याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. मृणालिनी कोळेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनीही या चिमुकल्यांसाठी खास थेरपी विकसित केल्याची माहिती पालकांना दिली.वाढदिवसाच्या दिवशी सकाळी या मुलांना स्पेशल किड््स बॉडी मसाज देण्यात आला. या मसाजनंतर आपल्याला फ्रेश वाटत असल्याचं चिमुकल्यांनी सांगितलं. या अनोख्या उपक्रमाने साताºयातील बदलत्या जीवनशैलीची झलक दिसत आहे. पूर्वी मोठ्यांसाठी जिथे बॉडी मसाज वर्ज्य मानला जायचा, त्याच शहरात आता चिमुकल्यांसाठी खास मसाज विकसित होतायत, या बदलाला कौतुकाचा भाग म्हणावा लागेल.धावपळ करणाºया मुलांसाठी हे आवश्यकचमोठ्यांप्रमाणेच मुलांचेही नियमित असे शेड्युल असते. यामुळे त्यांनाही दमायला होतं. मुलांना रिलॅक्स करण्यासाठी किडस स्पेशल बॉडी मसाज, हेड मसाज, रिफ्लेक्सोलॉजी फूट मसाज, मास्क थेरपी, बॉडी डिटॅन या गोष्टी आवश्यक आहेत. साताºयातील लिराज वेलनेस स्पाच्या डॉ. मृणालिनी कोळेकर यांनी मुलांसाठी ही खास थेरपी स्वत: विकसित केली आहे.
‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून चिमुकल्यांना ‘किड्स बॉडी मसाज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:45 PM