शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल; साताऱ्यातील पाटण तालुक्यामधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 5:57 PM

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

हणमंत यादव

चाफळ : झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून वडाप व्यावसायिकाचा खून करण्यात आला. ही घटना पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील भैरेवाडी, डेरवण येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. सीताराम बबन देसाई (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस खुन्याचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डेरवण ग्रामपंचायत अंतर्गत समावेश असणाऱ्या भैरेवाडी येथील सीताराम बबन देसाई हे चाफळ दाढोली मार्गावर खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री ते झोपेत असतानाच अज्ञाताने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.सीताराम देसाई यांचे भैरेवाडी येथे राहते घर आहे. तर गावाला लागूनच असणाऱ्या टेक नावाच्या शिवारात त्यांचे जनावरांचे शेड आहे. देसाई हे शुक्रवारी रात्री जेवण करून जनावरांच्या शेडकडे गेले होते. सकाळी ते घरी न परतल्याने घरचे लोक शेडकडे आले. त्यावेळी ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. देसाई यांच्याजवळ रक्ताने माखलेले दगड सापडल्याने दगडाने ठेचून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेच्या ठिकाणी ठसे तज्ज्ञासह श्वानपथकाला पाचारण केले. या घटनेची चाफळ पोलिस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केल्यानंतर देसाई यांचा मृतदेह पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सिध्दनाथ शेडगे व मनोहर सुर्वे तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस